मुंबई, 24 जुलै- अभिनेता सुनील ग्रोव्हर त्याच्या विनोदी शैलीमुळे लाखो लोकांच्या हृदयांच्या राज्य करतो. त्याची कॉमेडी आणि अभिनय लोकांना खूप आवडतो. ‘द कपिल शर्मा शो’मधील डॉ. गुलाटी यांची भूमिका सर्वांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे. मागच्या काही दिवसांपासून सुनील ग्रोव्हर कुठल्या नवीन प्रोजक्टमध्ये दिसलेला नाही. पण आता त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांना विचार करायला भाग पाडले आहे की, तो असे का करत आहे? त्यांच्याकडे काम नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुनील ग्रोव्हरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका गाडीवर मक्याचे कणीस भाजताना आणि फळे विकताना दिसत आहे. हा व्हिडिओ अभिनेत्याने त्याच्या स्वत:च्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओतील त्याची अवस्था पाहून चाहत्यांना मात्र चिंता वाटू लागली आहे. यामध्ये त्याच्यासोबत एक महिलाही दिसत आहे. व्हिडिओ शेअर करण्यासोबतच अभिनेत्याने लिहिले की, ‘नवीन मिशनच्या शोधत आहे.’ त्याच्या या व्हिडिओवर लोकांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत.
एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, सुनील सर तुम्ही कपिलच्या शोमध्ये कधी परत येणार आहाता.. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, भावा मक्याचे कणिस कसं दिलंय़ तर आणखी एकानं म्हटलं आहे की, गुलाटी विग घातलं असतं तर… आणखी एकानं कणसाची किंमत विचारली आहे. या व्हिडिओवर असंख्य कमेंट येत आहेत.
सुनील ग्रोव्हरचा यापूर्वी देखील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये तो फूटपाथवर कांदे विकताना दिसला होता. त्यावेळी त्याला कांदे विकताना पाहून लोकांना धक्का बसला होता. पण तो त्याच्या एका शोचा एक भाग होता. सुनील ग्रोव्हरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात दिसणार आहे. 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.