मुंबई, 6 नोव्हेंबर- 'सुंदरा मनामध्ये भरली' (Sundara Manamadhe Bharali) ही मालिका फारच लोकप्रिय झाली आहे. अल्पावधीतच या मालिकेने फार मोठा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे.मालिकेचा वेगळा विषय प्रेक्षकानाच्या मनाला भुरळ घालत आहे. एक जाडजुड पण मनाने सुंदर नायिका तर दुसरीकडे एकदम फिट खेळाडू असणारा हँडसम नायक आणि त्यांच्यामध्ये उलगडणारी केमेस्ट्री या मालिकेचा विशेष गाभा आहे. मालिकेतील कलाकरांही प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. अभिनेता समीर परांजपेने (Sameer Paranjpe) मालिकेत मुख्य अभिनेत्याची अर्थातच अभिमन्यू जहागीरदारची भूमिका साकारली आहे. मालिकेतील त्याची पत्नी-मैत्रीण लतिका आहे हे सर्वच जाणतो. मात्र त्याच्या खऱ्या आयुष्यातील लतिका कोण आहे माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला त्याच्या पत्नीविषयी सांगणार आहोत.
View this post on Instagram
'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका कलर्स मराठीवर आपल्या भेटीला येते. मालिकेतील नायक अर्थातच हँडसम अभिनेता समीर परांजपेच्या अनेक तरुणी फॅन्स आहेत. अनेक तरुणींना समीर परांजपेसारखा लाईफ पार्टनर हवा आहे. मात्र समीरची लाईफ पार्टनर त्याची पत्नी कशी दिसते? याबद्दल त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. समीर परांजपेने २०१६ मध्ये अनुजासोबत लग्न केलं होतं. अनुजा ही एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. ती सध्या पुण्यात नोकरी करते. हे दोघेही पुण्यातच राहात होते. मात्र कामानिमित्त समीरला मुंबईमध्ये राहावं लागत आहे. समीर आपल्या पत्नीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. या दोघांमध्ये फारच सुंदर बॉडिंग आहे.
View this post on Instagram
समीर परांजपेची पत्नी अनुजा दिसायला एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे. सोबतच अनुजा अत्यंत फिटसुद्धा आहे. ती लाइमलाईट पासून दूर असते. या सुंदर जोडपं काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा बनलं आहे. समीरला एक सुंदर लेक आहे. समीर हा मूळचा पुण्याचा आहे. त्याने पुण्यातूनचं आपलं शिक्षणदेखील पूर्ण केलं आहे. समीर हा एक इंजिनिअर आहे. मात्र त्याला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती. समीरने कॉलेजपासूनच अभिनयाला सुरुवात केली होती. त्याने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. त्याने 'माझे पती सौभाग्यवती' मालिकेतू आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र त्याला खरी ओळख 'गोठ' या मालिकेतून मिळाली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.
View this post on Instagram
तसेच समीरने नुकताच शाहरुख खानच्या 'क्लास ऑफ ८३' मद्ये त्यानं काम केलं आहे. सोबतच समीर परांजपेनं गर्जा महाराष्ट्र आणि अग्निहोत्र मालिकेतसुद्धा काम केलं आहे. समीरने 'भातुकली' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीतसुद्धा पदार्पण केलं आहे. समीरने आपला एक खास चाहतावर्ग निर्माण केला आहे. अनेक तरुणी त्याच्या स्माईलवर फिदा आहेत. सध्या समीर परांजपे अभ्या बनून 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून रसिक प्रेक्षकांचं मन जिंकत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.