ईमली या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुंबुल तौकीर खान ही आज छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयासोबतच प्रेक्षक तिच्या मनमोहक हास्याचं देखील कौतुक करतात.
परंतु आपल्या पहिल्याच मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या सुंबुलनं रुपेरी पडदा गाठण्यासाठी प्रचंड संघर्ष केला आहे. अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या या अभिनेत्रीनं वेळप्रसंगी एक वडापाव खाऊन देखील दिवस ढकलले आहेत.
ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिनं आपल्या करिअरवर भाष्य केल. त्यावेळी तिनं अभिनय क्षेत्रात येण्यासाठी करावा लागणारा संघर्ष सांगितला.
सुंबुल मुळची हैद्राबादची आहे. मुंबईत ती भाड्याच्या घरात राहाते. लहान असतानाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर वडिलांनीच तिचं पालनपोषण केलं.
तिला अभिनयाची प्रचंड आवड होती. त्यामुळं वडिलांनी एक-एक रुपया साठवून तिला अभिनय शिकवणाऱ्या क्लासेस मध्ये घातलं. त्यावेळी तिच्या घराची परिस्थिती इतकी वाईट होती. की वेळप्रसंगी केवळ एक वडापाव खाऊन त्यांना गुजराण करावं लागत होतं.
परंतु एका ऑडिशन दरम्यान इमली या मालिकेसाठी तिची निवड झाली अन् तिचं आयुष्य बदललं. या मालिकेमुळं तिला आर्टिकल 15 या चित्रपटात देखील काम करण्याची संधी मिळाली. सध्या मुंबईत हक्काचं घर खरेदी करणं हेच तिचं स्वप्न आहे.
तिनं अभिनय करावा यासाठी प्रचंड संघर्ष करणाऱ्या वडिलांना चार सुखाचे दिवस दाखवता यावे यासाठी ती प्रयत्न करतेय असंही ती या मुलाखतीत म्हणाली