जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'गौरीचा नाही, आता मालिकेचाच कडेलोट करा!' : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील नव्या ट्विस्टवर चाहते वैतागले

'गौरीचा नाही, आता मालिकेचाच कडेलोट करा!' : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील नव्या ट्विस्टवर चाहते वैतागले

'गौरीचा नाही, आता मालिकेचाच कडेलोट करा!' : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील नव्या ट्विस्टवर चाहते वैतागले

सुख म्हणजे नक्की काय असतं या (sukh mhanje nakki kai asta latest episode ) मालिकेत लवकरच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या ट्वविस्ट चाहते वैतागून वाटेल तसल्या कमेंट करत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 फेब्रुवारी- स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं या (sukh mhanje nakki kai asta latest episode ) मालिकेत लवकरच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. गौरीला मानसीचं सत्य लवकरच समजणार आहे. एका पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार गौऱीला लवकरच मानसी तिला धोका देत असल्याचे समजणार आहे. मात्र यानंतर गौरीला मानसी कड्यावरू खाली ढकलून देणार आहे. हे सत्य आहे की स्वप्न याचा उलगडा सुख म्हणजे नक्की काय असतं येणाऱ्या भागात होणार आहे. 27 फेब्रुवारील हा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. चाहत्यांना मात्र हा ट्वविस्ट रुचलेला नाही. ते वाटेल तसल्या कमेंट करत आहेत.

जाहिरात

प्रेक्षकांना मात्र हा ट्विस्ट काहीसा आवडलेला नाही. अनेकांनी मालिकेला ट्रोल करायला सुरूवात केलं आहे. एकानं म्हटलं आहे की, बंद करा मालिका काही ना काही कारस्थान चालू असत या मालिके मध्ये..मालिका चालू झाल्यापासून हेच आहे..तरं एकानं म्हटलं आहे की, प्रोमो पाहून समजतयं हे स्वप्न आहे. तर आणखी एकाने म्हटलं आहे की फालतू मालिका बंद करा. तर आणखी एकानं म्हटलं आहे की, फालतू मालिका पहिली बंद करा.. तर असंच एखानं म्हटलं आहे की, मानसी नाही तर जयदीपचं गौरील देणार कड्यावरुन ढकलून.. तर एकानं म्हटलं आहे की, त्या गौरीला नाही तर मालिकेलाट कड्यात ढकला..बकवास झाली आता..अशा अनेक कमेंट चाह्त्यांनी केल्या आहेत.

News18

News18

मागच्या काही दिवसांपासून मालिकेत जयदीप आणि गौरीचा लव्ह ट्रॅक दाखवण्यात येत होता. आता सगळं कथानक या दोघांच्या मुलाभोवती फिरत आहे. त्यात गौरी कधी आई होऊ शकणार नाही हे जेव्हापासून समजलं आहे तेव्हापासून मालिकेत वेगळाच ट्रॅक सुरू झालेला पाहायला मिळत नाही. अशातच मानशीची एंट्री आणि तिच वागणं आणि गौरीचा भोळापणा देखील प्रेक्षकांना खटकत आहे. या नवीन ट्वविस्टमुळे मालिका सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. मालिका ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात