सुशांत सिंह रजपूतने 14 जून रोजी आत्महत्या केल्यानंतर बॉलिवूड विश्वाला मोठा धक्का बसला होता. सुशांतनं आत्महत्या केली की हत्या झाली याचा सध्या वेगवेगळ्या पद्धतीनं तपास सुरू आहे.
सुशांतच्या अचानक जाण्यानं चाहत्याना आणि मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. सुशांतला कोणीच विसरू शकणार नाही.
पश्चिम बंगालमध्ये सुशांत सिंह रजपूतचे अनेक चाहते आहेत त्यापैकीच एका शिल्पकारनं त्यांचा पुतळा साकारला आहे. त्यांनी सुशांतची कमतरता भरून काढण्यासाठी खास मेणाचा हुबेहुब पुतळा तयार केला.
पश्चिम बंगालमधील आसनसोल इथे राहणारे शिल्पकार सुकांतो रॉय यांनी सुशांतचा मेणाचा पुतळा साकरला. 'मला सुशांत खूप आवडतो, तो आता या जगात नाही', अशा शब्दात रॉय यांनी आपली हळहळ व्यक्त केली.
हा पुतळा त्यांनी आपल्या संग्रहालयात ठेवण्यासाठी तयार केला आहे. हा अप्रतिम साकारलेला पुतळा पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होत आहे. सुशांतचा मेणाचा पुतळा पाहून त्याच्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न चाहते करत आहेत. सुशांतच्या कुटुंबियांना देखील अशा पद्धतीचा मेणाचा पुतळा हवा असेल तर तो तयार करून देण्याची ऑफर देखील रॉय यांनी दिली आहे.