Home /News /entertainment /

Aryan Khan case: शाहरुखसाठी कठीण काळ! मुलाच्या अटकेनंतर मुलगी सुहानाची प्रकृती बिघडली

Aryan Khan case: शाहरुखसाठी कठीण काळ! मुलाच्या अटकेनंतर मुलगी सुहानाची प्रकृती बिघडली

अभिनेता शाहरुख खानवर (Shahrukh Khan)अडचणींनी एकत्रच हल्लाबोल केल्याचं दिसत आहे. एकीकडे मुलगा आर्यनला (Aryan Khan Drug Case) ड्रग्स प्रकरणी अटक झाली आहे. तिला अजूनही जामीन मिळाला नाहीय. तर दुसरीकडे शाहरुख खानची मुलगी सुहाना खानची (Suhana Khan Health) प्रकृती बिघडली आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 14ऑक्टोबर- अभिनेता शाहरुख खानवर (Shahrukh Khan)अडचणींनी एकत्रच हल्लाबोल केल्याचं दिसत आहे.  एकीकडे मुलगा आर्यनला (Aryan Khan Drug Case) ड्रग्स प्रकरणी अटक झाली आहे. तिला अजूनही जामीन मिळाला नाहीय. तर दुसरीकडे शाहरुख खानची मुलगी सुहाना खानची (Suhana Khan Health) प्रकृती बिघडली आहे. आर्यन खानच्या अटकेमुळे सुहानाची अशी अवस्था झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे शाहरुख खान सध्या अनेक अडचणींमध्ये सापडल्याचं दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

  टाइम्सच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या मुलीने आपल्या भाऊ आर्यन खानच्या अटकेचा मोठा धसका घेतला आहे. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली आहे. ३ ऑक्टोबर रोजी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एका हायप्रोफाईल क्रूझवरील रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली होती. या ड्रग्स प्रकरणामुळे आर्यनसह इतर ७ जणांना कस्टडीत ठेवण्यात आलं आहे. सध्या आर्यन खानच्या प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरु आहे. मात्र त्याला आजही जामीन मिळाला नाही. त्यामुळे शाहरुखखान आणि त्याचं कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे. एकीकडे आर्यन खान अटकेत आहे. तर दुसरीकडे मुलगी सुहानाची तब्ब्येत खालावली आहे. (हे वाचा:ED कार्यालयात पोहोचली अभिनेत्री नोरा फतेही; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात होणार चौकशी) सुहाना खान सध्या आपल्या शैक्षणिक कारणासाठी न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास आहे. आर्यन खानच्या अटकेची माहिती मिळताच ती मुंबईला परतणार होती. मात्र तणावाने अचानक तिची तब्ब्येत बिघडल्याने तिला न्यूयॉर्कमध्येच थांबावं लागलं. तसेच शाहरुख खान आणि गौरीने सुहानाला तिथेच थांबण्याचा सल्ला दिला आहे. आत्ताच तिला मुंबईला न येण्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे सध्या सुहाना एकटीच न्यूयॉर्कमध्ये आहे. मात्र तिला जेव्हापासून समजलं आहे आर्यनच्या चिंतेत शाहरुख खान ना' नीट जेवत आहे ना नीट झोपत आहे सुहानाला आणखीनच कुटुंबाची चिंता लागली आहे त्यामुळे तिची तब्ब्येत बिघडली आहे.सुहाना खान आणि आर्यन खानमध्ये फार छान बॉन्डिंग आहे. त्यामुळे या र्व प्रकरणाचा तिच्यावर मोठा परिणाम झाला आहे. तर दुरीकडे शाहरुख खानचा मुलगा अबरामलासुद्धा या सर्व परिस्थितीतून जावं लागत आहे. तो अजून या सर्व गोष्टीं समजून घेण्यासाठी फार लहान आहे. त्यामुळे या सर्वाचा परिणाम त्याच्यावर होऊ नये म्हणून शाहरुख आणि गौरीने त्याला या सर्वापासून दूर ठेवले आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Shahrukh khan, Suhana khan

  पुढील बातम्या