9 व्या वर्षी सुरु केलं होतं करिअर; पाहा अरूणा ईरानी यांचा थक्क करणारा प्रवास

9 व्या वर्षी सुरु केलं होतं करिअर; पाहा अरूणा ईरानी यांचा थक्क करणारा प्रवास

बालकलाकार,खोडकर तरुणी, मादक आयटम गर्ल इथपासून अगदी हिरोंच्या आईपर्यंत विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत.

  • Share this:

मुंबई 3 मे: अरूणा ईरानी (Aruna Irani) या भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. जवळपास सात दशकं त्यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर गाजवली आहेत. बालकलाकार,खोडकर तरुणी, मादक आयटम गर्ल इथपासून अगदी हिरोंच्या आईपर्यंत विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. (Happy Birthday Aruna Irani) 74व्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाहूया 500 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये झळकणाऱ्या या अभिनेत्रीचा थक्क करणारा प्रवास...

अरूणा यांचा जन्म 1952 साली मुंबईतील एका मध्यवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांची एक नाटक कंपनी होती. त्यामुळं घरातच त्यांना अभिनयाचं वातावरण मिळालं. 3 वर्षांच्या असल्यापासून अरूणा अभिनय करत आहेत. त्यांनी गणेशोत्वानिमित्त आयोजिक केल्या गेलेल्या एका नाटकातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांचा अभिनय पाहून तत्कालिन काही दिग्दर्शकांनी त्यांना व्यवसायिक मराठी रंगभूमीवर काम करण्याची संधी दिली. तिथं चार-पाच वर्ष काम केल्यानंतर त्यांना वयाच्या नवव्या वर्षी गंगा जमुना या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. अन् तिथुनच खऱ्या अर्थानं त्यांना करिअरची सुरुवात झाली.

ब्लॅक साडीमधल्या ग्लॅमरस PHOTO नी नेटकऱ्यांना केलं घायाळ; कधी काळी जसप्रीत बुमराह बरोबर चर्चेत होतं नाव!

त्यानंतर त्यांनी ‘नर्तकी’, ‘गंगा की लहरे’, ‘फर्ज’, ‘उपकार’, ‘लैला मजनु’, ‘हम पाच’, ‘राजा बाबु’, ‘लाडला’, ‘सुहाग’ यांसारख्या 500 हून अधिक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. अमिताभ बच्चन यांच्या ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटामुळं त्या खऱ्या अर्थानं लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांनी चित्रपटांसोबतच मालिकांमध्येही काम केलं आहे. 500 पेक्षा अधिक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या अभिनेत्री आहेत. वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Published by: Mandar Gurav
First published: May 3, 2021, 9:01 AM IST

ताज्या बातम्या