अभिनेता सुबोध भावे कामात कितीही व्यग्र असला तरी, आपल्या कुटुंबासाठी वेळ काढणं त्याला चांगलंच माहिती आहे.
सुबोधची पत्नी मंजिरी भावे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या लेकाच्या बर्थडे पार्टीचे शेअर केले आहेत.
कान्हाच्या बर्थडेचा केक फारच खास होता. या केकवर त्याचा आवडता खेळ फुटबॉलचा सिम्बॉल दिसून आला. सोबतच नेमार, स्पोर्ट्स शूज, फ्रेंड्स या सीरिजचा एक फोटो, तंदूर प्लेट, इयरफोन्स आणि मजेशीर म्हणजे टॉयलेट सीटसुद्धा यावर बनवण्यात आली होती.