आई कुठे काय करते मालिकेतील खलनायिका म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. तिचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत.
तिचे नवनवीन लुकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तीने तिचे राजेशाही लुकमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये रुपालीने सुंदर जांभळ्या रंगाचा लेंहगा परिधान केला असून त्यावर मोजकेच दागिने घातले आहेत. या लूकमध्ये रुपाली खूपच मनमोहक दिसत आहे.
या नवीन लुकमध्ये रुपाली एखाद्या राणीसारखी सुंदर दिसतेय. तिच्या या लुकची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी 'तू एखाद्या सुंदर राजकुमारी सारखी दिसत आहेस, राणी दिसत आहेस' अशा कमेंट केल्या आहेत.
रुपाली भोसले आई कुठे काय करते मधून प्रकाशझोतात आली असली तरी त्याआधी तिने अनेक मराठी हिंदी मालिकांमधून काम केलं आहे.