Sridevi Birth Anniversary : बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवीची एव्हरग्रीन गाणी

Sridevi Birth Anniversary : बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवीची एव्हरग्रीन गाणी

80-90 च्या दशकातील अभिनेत्री श्रीदेवीची (Sridevi) कित्येक गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहेत.

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : भारतातील पहिली महिला सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी. त्या काळात श्रीदेवी लेडी अमिताभ म्हणून ओळखली जायची. हिरोंप्रमाणे सर्वात जास्त मानधन घेणारी ही अभिनेत्री. 13 ऑगस्ट 1963 ला जन्मलेल्या श्रीदेवीने वयाच्या चौथ्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात करिअर सुरू केलं. 1969 साली तामिळ फिल्म 'थुनैवन' हा तिचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर 1975 साली तिनं 'जुली' चित्रपट केला होता. या दोन्ही फिल्ममध्ये तिनं बालकलाकार म्हणून भूमिका केली. तर 1979 साली 'सोलावा सावन'मध्ये तिनं खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिनं अनेक हिट फिल्म्स दिल्या.अभिनयासह तिच्या नृत्यानेही जादू गेली.

श्रीदेवीच्या बहुतेक फिल्म्समधील प्रसिद्ध झाली आणि आजही ती तितकीच प्रसिद्ध आहेत. नव्या पिढीकडूनही ही गाणी ऐकायला मिळतील. आज श्रीदेवीच्या Birth Anniversary निमित्ताने तिची अशीच काही एव्हरग्रीन गाणी पाहुयात.

हवा हवाई (मि. इंडिया) : बिजली गिराने मै हु आई कहते है मुझको हवा हवाई... श्रीदेवीचं हे गाणं आजही प्रत्येकाला आवडतं. यामध्ये श्रीदेवीच्या हावभाव आणि नृत्याने सर्वांनाच आकर्षित केलं.

मेरे हाथो मे (चांदनी) : आजही कित्येक लग्नांमध्ये हे गाणं ऐकायला मिळतं. या गाण्यातही श्रीदेवीच्या डान्सची अदाकारी पाहायला मिळते.

काटे नहीं कट ते (मि. इंडिया) : श्रीदेवीचं रोमँटिक असं हे गाणं. जे ऐकलं आणि पाहिलं की आजही प्रेमीयुगुलांची धडधड वाढते.

ना जाने कहाँ से आई है (चालबाज) : हातात छत्री घेऊन आणि अंगावर रेनकोट घालून पावसात डान्स करणारी श्रीदेवी प्रत्येकालाच आठवते.

कभी मैं कहू (लम्हे) : श्रीदेवीचं हे आणखी एक लव्ह साँग. प्रत्येक जण हे गाणं ऐकत मंत्रमुग्ध होतो.

नवराई माझी ( English Vinglish) : हल्लीच्या लग्नात प्रत्येकाला थिरकायला लावणारं हे गाणं. श्रीदेवीनं यात काही क्षणच डान्स केला आहे, मात्र तो पाहतानाही मनाला एक वेगळाच आनंद होतो.

हे वाचा - सैफ आहे अब्जावधींचा मालक; अद्याप तैमूरला केलं नाही वारसदार

आज श्रीदेवी आपल्यात नाही. 24 फेब्रुवारी 2018 साली तिचं निधन झालं. मात्र तिच्या फिल्म्स आणि गाणी तिच्या आठवणींना उजाळा देतात.

Published by: Priya Lad
First published: August 13, 2020, 9:36 AM IST

ताज्या बातम्या