Home /News /entertainment /

RRR पाहून महेशबाबूने केले एकापाठोपाठ एक ट्विट, रामचरण-Jr. NTR बाबत म्हणाला...

RRR पाहून महेशबाबूने केले एकापाठोपाठ एक ट्विट, रामचरण-Jr. NTR बाबत म्हणाला...

साऊथ सुपरस्टार (South Superstar) राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआरचा (Jr. Ntr) बहुचर्चित चित्रपट RRR बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

    मुंबई, 27 मार्च-  साऊथ सुपरस्टार   (South Superstar)  राम चरण   (Ram Charan)  आणि ज्युनियर एनटीआरचा   (Jr. Ntr)  बहुचर्चित चित्रपट RRR बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट भारतातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर म्हणून वाटचाल करत आहे. फक्त देशातीलच नव्हे तर जगभरातील लोक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. दिग्दर्शक SS राजामौली  (S.S. Rajamouli) यांचं अभिनंदनदेखील करत आहेत. साऊथ सुपरस्टार महेश बाबूनेदेखील  (Mhesh Babu)  RRR च्या यशाबद्दल दिग्दर्शक आणि त्यातील कलाकारांचं कौतुक केलं आहे.अभिनेत्याने याला एपिक फिल्म म्हटलं आहे. आणि त्यासाठी अनेक ट्विटसुद्धा केले आहेत. महेशबाबूने आपल्या ट्विटर हॅन्डलवर ट्विट करत म्हटलं आहे, 'येथे अनेक चित्रपट आहेत मग हा एसएस राजामौली यांचा चित्रपट आहे..RRR' हा एपिक सिनेमा आहे..स्केल, भव्यता, दृश्य, संगीतआणि भावना अकल्पनीय आणि अतिशय मनमोहक आहेत.. चित्रपट अप्रतिम आहे. .' असं म्हणत अभिनेत्याने तोंडभरुन चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं आणि कलाकारांचं कौतुक केलं आहे. तसेच अभिनेत्याने चित्रपटाच्या क्रू आणि व्हिज्युअल इफेक्ट्सच्या क्रिएटिव्ह टीमचंही कौतुक केलं आहे. महेशबाबूने ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्यासाठी एक ट्विट केलं आहे, तारक आणि चरण यांना टॅग करतत्याने लिहिलंय, 'चला स्टारडमपासून पुढे जाऊया आणि एक परफॉर्मन्स देऊ जो आऊट ऑफ द वर्ल्ड म्हणजेच जगाच्या बाहेर आहे... नाटु- नाटु गाण्यात गुरुत्वाकर्षणाचा नियम दिसलाच नाही! ते अक्षरशः जणू हवेत उडत होते..' याशिवाय, त्याने आणखी एक ट्विट केलं आहे ज्याद्वारे त्याने चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे. यामध्ये महेश बाबूने लिहिलंय , 'या मोठ्या प्रोजेक्टच्या निर्मितीसाठी 'RRR' च्या संपूर्ण टीमला सलाम!! खूप अभिमान! तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन...' यात त्याने आलिया भट्ट, अजय देवगन, ऑलिव्हिया मॉरिस, केके सेंथिल कुमार, एमएमकीरावानी आणि पी.समुथिराकणी यांना देखील टॅग केलं आहे ज्यांनी यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Mahesh babu, South indian actor

    पुढील बातम्या