जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Mahesh Babu! साऊथ सुपरस्टार ठरला Real Hero, वाचवले 30 मुलांचे प्राण

Mahesh Babu! साऊथ सुपरस्टार ठरला Real Hero, वाचवले 30 मुलांचे प्राण

Mahesh Babu! साऊथ सुपरस्टार ठरला Real Hero, वाचवले 30 मुलांचे प्राण

साऊथ सुपरस्टार (South Superstar) महेश बाबू (Mahesh Babu) आज आपल्या अभिनयाच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध झाला आहे. तो जितका उत्कृष्ट अभिनेता आहे तितकाच उत्तम माणूससुद्धा आहे. तो आपल्या सामाजिक कार्यातून नेहमीच लोकांची मनं जिंकत असतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 एप्रिल-  साऊथ सुपरस्टार   (South Superstar)  महेश बाबू   (Mahesh Babu) आज आपल्या अभिनयाच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध झाला आहे. तो जितका उत्कृष्ट अभिनेता आहे तितकाच उत्तम माणूससुद्धा आहे. तो आपल्या सामाजिक कार्यातून नेहमीच लोकांची मनं जिंकत असतो. महेश बाबू नेहमीच अनेक लोकांना मदत करताना दिसून येतो. 2 मुलांचा प्रेमळ बाप असलेला हा अभिनेता आपल्या फाउंडेशन अंतर्गत अनेक अनाथ आणि निराधार मुलांची मदत करत असतो. नुकतंच सर्वत्र जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. महेश बाबूने या दिवशी एक असं काम केलं की सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त महेशने 30 पेक्षा अधिक मुलांचे प्राण वाचवले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी अभिनेत्याने आर्थिक साहाय्य केलं आहे. महेशबाबूच्या सहाय्यक वृत्तीबाबत एव्हाना सर्वांनाच माहिती आहे. कारण तो पीडित मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक सहाय्य करत असतो. अलीकडेच, अभिनेत्याने आंध्र हॉस्पिटल, विजयवाडा आणि महेश बाबू फाउंडेशनमधील डॉक्टरांच्या मदतीने 30 मुलांवर हृदय शस्त्रक्रिया केली आहे. महेश बाबू यांच्या पत्नी नम्रता शिरोडकरने त्यांच्या इन्स्टाग्रामवर आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिस्वा भूषण हरिचंदन यांनी कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल आणि त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानलेआहेत.

जाहिरात

नम्रता शिरोडकर पोस्ट- नम्रताच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘जागतिक आरोग्य दिनानिमित्त ३० मुलांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या कार्याचे आयोजन माननीय राज्यपाल श्री विश्वभूषण हरिचंदन गरू यांनी केले होते. नम्रताने पुढे माहिती दिली की, “वैद्यकीय उत्कृष्टता आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल @andhrahospitals टीमचे आभार.” नम्रताने महेशच्या आर्थिक मदतीसह शस्त्रक्रिया करणाऱ्या मुलांचे काही फोटोही शेअर केले आहेत.त्यानंतर चाहते अभिनेत्याचं प्रचंड कौतुक करत आहेत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आजपर्यंत महेशबाबूने १००० पेक्षा जास्त मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक निधी उभा केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात