मुंबई, 10 डिसेंबर: बाहुबली (Bahubali) सिनेमातली राजकुमारी, साऊथची टॉपची हिरोईन आणि चक्क नावेतून प्रवास? आम्ही बोलतोय अभिनेत्री अनुष्का शेट्टीबद्दल (Anushka Shetty). काही दिवसांपूर्वी एका मंदिरात जाण्यासाठी चक्क तिने एका छोट्याश्या बोटीतून प्रवास केला होता. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अनुष्काचा जवळजवळ सगळा चेहरा झाकलेला असल्यामुळे तिला ओळखणंही कठीण झालं होतं.
कुठे गेली होती अनुष्का शेट्टी?
अनुष्का गोदावरी तीरावर वसलेल्या पोलावरम गावातील वीरभद्र स्वामींच्या मंदिरात दर्शनासाठी गेली होती. तिथे जाताना दुसरं कोणतंही वाहन नाही त्यामुळे तिने चक्क एका छोट्याश्या नावेतून प्रवास केला. सगळं स्टारडम बाजूला ठेवत ती देवाच्या चरणी लीन होण्यासाठी तिथे गेली होती.
#AnushkaShetty Performs Special Pujas At at 'Maha Nandiswar' Temple In #Polavaram pic.twitter.com/ltJ1hehTrm
— @Yeruvaka99 - Bujji (@Yeruvaka99) December 10, 2020
పట్టిసీమ ప్రాంతంలో ఉన్న నందీశ్వర స్వామి దేవాలయం సందర్శించి స్వామి వారిని దర్శించుకున్న అనుష్క శెట్టి. #AnushkaShetty #NandeeswaraSwamyTemple pic.twitter.com/LHOkIvJTol
— Rajesh Manne (@rajeshmanne1) December 9, 2020
कोरोना काळात सोशल मीडियावर एन्ट्री
अनुष्का शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियापासून लांब होती. पण कोरोना काळात सोशल मीडियावर आगमन करत तिने चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. अनुष्का आता सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करत असते.
Hi all Hope you all doing well and keeping safe . Follow me on my official twitter account @MsAnushkaShetty for some interesting updates in the coming days for all of you ! pic.twitter.com/SjsbnOZiRj
— Anushka Shetty (@MsAnushkaShetty) September 30, 2020
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, बागमती या सिनेमानंतर ती मोठ्या पडद्यावर झळकलेली नाही. तिच्या हातात अनेक नवनवीन चित्रपट आहेत. लवकरच ती प्रक्षेकांना नव्या प्रोजेक्ट्समधून दिसेल.