जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / लग्नाच्या 4 दिवस आधीच प्रसिद्ध अभिनेता पडला बेशुद्ध; नक्की काय झालं?

लग्नाच्या 4 दिवस आधीच प्रसिद्ध अभिनेता पडला बेशुद्ध; नक्की काय झालं?

अभिनेता नागा शौर्या

अभिनेता नागा शौर्या

मनोरंजन सृष्टीतून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. साऊथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेता नागा शौर्याची तब्येत बिघडल्याची बातमी समोर येत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 नोव्हेंबर : मनोरंजन सृष्टीतून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. साऊथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेता नागा शौर्याची तब्येत बिघडल्याची बातमी समोर येत आहे. तो सध्या एनएस 24 चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. मात्र या शूटिंगदरम्यान अभिनेता बेशुद्ध पडल्याचं समोर आलं आहे. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचे चाहतेही या बातमीमुळे त्याच्याविषयी चिंता व्यक्त करत आहेत. अभिनेत्याला नक्की काय झालं आणि तो कशामुळे बेशुद्ध पडला असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित होत आहेत. चला तर मग जाणून घेऊया अभिनेता नागा शौर्याला नक्की काय झालं होतं. अभिनेता नागा शौर्याची एनएस 24 सिनेमाच्या सेटवर तब्येत अचानक बिघडली आणि तो सेटवरच बेशुद्ध पडला. त्याला हैद्राबाद येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता अभिनेत्याला खूप ताप असल्याचे आढळून आले. अशा स्थितीत त्याची प्रकृती ढासळली. नागाच्या शरिरात अशक्तपणा आल्यामुळे तो बेशुद्ध पडला. आता अभिनेत्याची प्रकृती चांगली आहे आणि काळजी करण्यासारखे काही नाही. लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्जही मिळणार आहे.

जाहिरात

नागा शौर्याची प्रकृती नो वॉटर डाएटमुळे म्हणजेच कोणत्याही द्रवपदार्थाचे सेवन न केल्याने बिघडली. झी न्यूजच्या वृत्तानुसार, नागा शौर्या त्याच्या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे आणि त्यामुळेच नागा शौर्या चांगली बॉडी तयार करण्यासाठी खूप मेहनत घेत होता. अभिनेता कठोर आहाराचे पालन करत होता, ज्यामध्ये पाणी नसलेल्या आहाराचा समावेश होता. त्यामुळेच त्याची प्रकृती ढासळली.

News18लोकमत
News18लोकमत

नागा शौर्या एक साऊथ अभिनेता असून तो लेखक आणि निर्मातादेखील आहे. तो येत्या 20 नोव्हेंबरला अनिषा शेट्टीसोबत लग्न करणार आहे. दोघेही बंगळुरुमध्ये लग्नगाठ बांधणार आहे. दोघांनी त्यांची लग्नपत्रिकाही चाहत्यांसोबत शेअर केली आहे. चाहतेही या लग्नासाठी खूप उत्सुक आहेत. अशातच नागा लग्नाच्या चार दिवस आधीच बेशुद्ध पडल्याने सगळे चिंतेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात