Home /News /entertainment /

'बॉलिवूडला मी परवडणार नाही..', साऊथ स्टार महेश बाबूचं वक्तव्य चर्चेत

'बॉलिवूडला मी परवडणार नाही..', साऊथ स्टार महेश बाबूचं वक्तव्य चर्चेत

सध्या बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटसृष्टी यामध्ये मोठ्या प्रमाणात विवाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच अजय देवगण आणि किचा सुदीप (Bollywood vs south industry) या दोघांमध्ये ट्विटर वॉर रंगलं होतं. यानंतर आता साऊथ सुपरस्टार महेश बाबू याचंही बॉलिवूडबद्दलचं (Mahesh Babu on Bollywood) वक्तव्य माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

पुढे वाचा ...
     मुंबई, 10 मे-  सध्या बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटसृष्टी यामध्ये मोठ्या प्रमाणात विवाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच अजय देवगण आणि किचा सुदीप (Bollywood vs south industry) या दोघांमध्ये ट्विटर वॉर रंगलं होतं. यानंतर आता साऊथ सुपरस्टार महेश बाबू याचंही बॉलिवूडबद्दलचं (Mahesh Babu on Bollywood) वक्तव्य माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. मेजर चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी महेशबाबूने ‘बॉलिवूडमध्ये काम करून मला माझा वेळ वाया नाही घालवायचा’ असं वक्तव्य केल्यामुळे लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. बॉलिवूडमध्ये येणार नाही अदिवी शेष यांच्या 'मेजर' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला (Major Movie launch) महेश बाबू उपस्थित होते. यावेळी त्यांना बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार आहात, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर महेश बाबू म्हणाले, “मला बॉलिवूडमधून कित्येक ऑफर्स मिळतात. मात्र, मला नाही वाटत की मला ते लोक अफोर्ड करू शकतील. जे लोक मला अफोर्ड (Bollywood can’t afford me says Mahesh Babu) करू शकत नाहीत, अशा इंडस्ट्रीमध्ये मला काम नाही करायचं.” यामुळे महेशबाबू हिंदीमध्ये पदार्पण करणार नाही हे निश्चित झालंय. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. टॉलिवूडने दिलं प्रेम आणि सन्मान- मला साऊथच्या सिनेमांनी जेवढं स्टारडम, प्रेम आणि सन्मान मिळवून दिला, तो भरपूर आहे. त्यामुळे आपली इंडस्ट्री सोडून दुसरीकडे काम करण्याचा विचार मी सध्या करत नाहीये. मी नेहमी मोठं व्हायचं आणि भरपूर सिनेमे बनवायचं स्वप्न पाहिलं होतं. माझं स्वप्न आता खरं होत आहे, त्यामुळे मी इथे भरपूर खूश आहे; असं महेशबाबू यावेळी म्हणाले. महेश बाबूने यापूर्वीही वेळोवेळी हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याचा विचार नसल्याचं (Mahesh Babu on Bollywood debut) बोलून दाखवलं आहे. काही दिवसांपूर्वीच महेशबाबूने आपल्या बिग बजेट चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री घेणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. या बिग बजेट चित्रपटाचं दिग्दर्शन एस.एस. राजमौली करणार आहेत. 12 मे रोजी येणार नवा चित्रपट- यापूर्वी 2020 मध्ये महेशबाबूचा ‘सरीलेरू नीकेव्वारू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर आता दोन वर्षांनंतर ‘सरकारू वारी पेटला’ (Sarkaru Vaari Petla) या चित्रपटातून महेशबाबू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 12 मे रोजी हा चित्रपट रिलीज होईल. या सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
    First published:

    Tags: Entertainment, Mahesh babu, South indian actor

    पुढील बातम्या