मुंबई, 28 एप्रिल : 2012मध्ये आलेल्या स्टूडंट ऑफ द इअर या सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला यशस्वी ठरला होता. त्यानंतर आता या सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिनेमामधील Hook Up साँगचा टीझर रिलीज झाला. यात टायगर श्रॉफ सोबत आलिया भट डान्स करताना दिसत आहे. हे गाणं आज (28 एप्रिल) रिलीज होणार आहे. निर्माता करण जोहर या गाण्याचा टीझर त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करत याची माहिती दिली. करण जोहर व्यतिरिक्त टायगर आणि आलिया यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा टीझर शेअर केला आहे.
वाचा : करण-कजोलला मिळालं ‘बेबीसिटिंग’चं काम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण जोहरनं हा टीझर पोस्ट करत त्याला ‘‘It’s TIGERSHROFF + @aliaa08 = #Talia!‘‘असं कॅप्शन दिलं आहे. या टीझरमध्ये आलिया आणि टायगरची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या गाण्याची कोरिओग्राफी फराह खाननं केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईच्या ‘मेहबूब स्टुडिओ’मध्ये या गाण्याचं शूटिंग झालं आहे. मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक पुनीत मल्होत्रा म्हणाले, ‘आलिया आणि टायगर यांची जोडी प्रेक्षकांना नक्की आवडेल. Hook Up साँगसाठी या दोघांनी खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे. हे गाणं आमचं ट्रम्प कार्ड आहे. म्हणून आम्ही ते शेवटपर्यंत गुपित ठेऊ इच्छित होतो.’
Can't miss this even if I'd try! Glad to share this special song with an ex-student!🔥 @aliaa08 #HookUpSong@karanjohar @apoorvamehta18 #Tara @ananyapandayy @punitdmalhotra @VishalDadlani @ShekharRavjiani @DharmaMovies @foxstarhindi @ZeeMusicCompany @SOTYOfficial #SOTY2 pic.twitter.com/7BFONffwtz
— Tiger Shroff (@iTIGERSHROFF) April 27, 2019
Photos- बॉलिवूडच्या लव्हबर्ड्सनेही पाहिला ‘एवेंजर्स एंडगेम’ करण जोहरनं 2012मध्ये ‘स्टूडंट ऑफ द इअर’मधून आलिया भट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्राला लाँच केलं होतं. याशिवाय या सिनेमाचं दिग्दर्शनही करण जोहरनंच केलं होतं. त्यानंतर 7 वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल ‘स्टूडंट ऑफ द इअर 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका असून अनन्या आणि तारा या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. हा सिनेमा येत्या 10 मे ला रिलीज होणार आहे. वाचा : वर्षाला 35 कोटी कमवणारा वरुण धवन आहे एवढ्या संपत्तीचा मालक