जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'कुसुम' मालिका बंद होणार म्हणून शिवानी झाली भावुक; प्रेक्षक व निर्मात्यांचे मानले आभार!

'कुसुम' मालिका बंद होणार म्हणून शिवानी झाली भावुक; प्रेक्षक व निर्मात्यांचे मानले आभार!

'कुसुम' मालिका बंद होणार म्हणून शिवानी झाली भावुक; प्रेक्षक व निर्मात्यांचे मानले आभार!

सोनी मराठी (Sony Marathi ) वाहिनीवर ‘कुसुम’ (kusum ) ही नवी मालिका 2021 मध्ये ऑक्टोबरपासून भेटीला आली होता. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

**मुंबई, 27 फेब्रुवारी-**सोनी मराठी (Sony Marathi ) वाहिनीवर ‘कुसुम’ (kusum ) ही नवी मालिका 2021 मध्ये ऑक्टोबरपासून भेटीला आली होता. ही मालिका एकता कपूरच्या हिंदी मालिका ‘कुसुम’ रिमेक आहे. मराठीत देखील या मालिका प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. लवकरच कुसुम मालिका ( kusum last episode) बंद होणार आहे. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मालिका बंद होण्यामागचं कारण अद्याप समोर आलेले नाही. प्रेक्षक मात्र नाराज झाले आहेत. सोनी मराठीनं इन्स्टा पोस्ट करत म्हटलं आहे की, कुसुम मालिकेस दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार! यानंतर अनेकांनी कमेंट करत मालिकेचा शेवट काय असणार याबद्दल विचारले आहे. या मालिकेत सर्वांची लाडकी शितली म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकर कुसुमची भूमिका साकारताना दिसते. मालिका निरोप घेणार म्हटल्यावर शिवानी देखील काहीशी भावुक झाली आहे. तिनं इन्स्टा पोस्ट करत निर्माते आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.तसेच मी सर्वांना मिस करणार असल्याचे म्हणत तिनं काही सेटवरील फोटो देखील शेअर केले आहेत.

जाहिरात

कुसुम आणि अनुजच्या नात्यात तिसरी व्यक्ती कुसुमचीच बालपणीची मैत्रीण एलिशाची नुकतीच एंट्री झाली होती. एलिशाचे आणि अनुज यांच्यातील सत्य कुसुमलं समजलं आहे. अशातच आता एलिशामुळे अनुजला गोळी लागली आहे. त्यामुळे मालिकेचा शेवट नेमका कसा होणार याची चिंता प्रेक्षकांना लागली आहे. शिवाय कुसुम आणि अनुजला देखील प्रेक्षकांना एकत्र पाहायचे आहे. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहेत.

एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्स तर्फे ‘कुसुम’ नावाची हिंदी मालिका आली होती आणि ती खूपच लोकप्रियही झाली होती. 2001साली ती प्रसारित झाली होती आणि त्याच मालिकेचा हा मराठी अवतार आहे. तेव्हाही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आणि रेकॉर्ड ब्रेकर ठरली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात