मुंबई, 21 फेब्रुवारी- बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम सध्या प्रचंड चर्चेत आहे. गायकालंका काल रात्री चेंबूर येथील लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान धक्काबुक्की करण्यात आली आहे. शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नीलने हा सर्व प्रकार केल्याचा आरोप आहे. या कॉन्सर्टचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काही वेळेपूर्वी या सर्व प्रकणावर स्वतः सोनू निगमने प्रतिक्रिया देत घडलेला सर्व प्रकार सांगितला होता. दरम्यान आता आमदारांच्या मुलीने ट्विट करत या सर्व प्रकारावर भाष्य केलं आहे. चेंबूरच्या कॉन्सर्टमधील सोनू निगमचा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान आता प्रकाश फातर्पेकर यांची लेक आणि स्वप्नील फातर्पेकरची बहीण सुप्रदा फातर्पेकर ने याबाबतीत एक ट्विट शेअर केला आहे. (हे वाचा: Sonu Nigam News: चेंबूर कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं? सोनू निगमने स्वतः केला खुलासा ) ट्विट करत सुप्रदा फातर्पेकरने लिहलंय, ‘मोठ्या गर्दीमुळे त्याठिकाणी गोंधळ माजला होता. जो व्यक्ती खाली कोसळला होता, त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आहे. सोनू निगमसुद्धा आता उत्तम आहेत. आम्ही संस्थेकडून अधिकृतपणे काल घडलेल्या सर्व प्रकारची सोनू निगम आणि त्यांच्या टीमकडे माफी मागितली आहे. त्यामुळे कृपया या विषयावर राजकारण करणाऱ्या कोणत्याही वृत्तांवर विश्वास ठेऊ नका’. असं म्हणत आमदाराच्या लेकीने स्पष्टीकरण दिलं आहे.
Shri Sonu Nigam is unhurt. On behalf of the organisation team, we have officially apologised to Sonu sir & his team for the unpleasant incident.
— Suprada Phaterpekar (@suprada17) February 20, 2023
Please donot believe any baseless rumours and those who are trying to politicize the matter. ( 3/3 )
तत्पूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड गायक सोनू निगमने स्वप्नील फातर्पेकरवर चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गायकाने आपल्या कार्यक्रमात स्वप्नीलने आपल्याला धक्काबुक्की करत, खाली पाडल्याचा आरोप केला आहे.
सोनू निगमचा खुलासा- दरम्यान सोनू निगमने या प्रकरणावर मौन सोडत नेमकं काय घडलं? हे उघड केलं आहे. याबाबत बोलताना सोनू निगम म्हणाला, ‘काहीही घडलेलं नाहीय. माझा कॉन्सर्ट संपल्यानंतर मी स्टेजवरुन खाली निघालो होतो. दरम्यान स्वप्नील नावाच्या मुलाने मला पकडलं आणि सेल्फी घेण्याचा प्रयत्न करु लागला. मला त्याच नाव सर्व प्रकार झाल्यानंतर समजलं. या सेल्फी आणि व्हिडीओच्या जगात लोक काहीही समजून घ्यायला तयार नसतात.अशातच माझ्या मदतीसाठी पुढे आलेले माझे दोन टीम मेम्बर जखमी झाल्याचंही त्याने सांगितलं आहे.