बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर सतत काही ना काही पोस्ट करत असते. आजही अनुष्का शर्माने एक पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीला एक ब्रँडेड शूज गिफ्ट मिळाल्याचं दिसत आहे. महत्वाचं म्हणजे अनुष्कासाठी हे शूज गिफ्ट म्हणून आनंद अहुजाने पाठवले आहेत. आनंद अहुजा हा अभिनेत्री सोनम कपूरचा पती आहे. तो एक बिझनेसमन आहे. खरं तर, त्याच्या बिझनेसपैकी शूज ब्रँड हादेखील एक बिझनेस आहे. आनंद अहुजाच्या शूज ब्रँडचं नाव ‘Veg Non Veg’ असं आहे. आनंदने आपल्या ब्रँडचे एक सुंदर शूज अनुष्का शर्माला पाठवले आहेत. अनुष्कानेदेखील स्टोरी शेअर करत आभार मानले आहेत .