सोनम होणार राणा दग्गुबतीची मेहुणी? कपूर फॅमिलीशी मिहिकाचं काय आहे कनेक्शन

सोनम होणार राणा दग्गुबतीची मेहुणी? कपूर फॅमिलीशी मिहिकाचं काय आहे कनेक्शन

मिहिकाच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून काहींनी अंदाज लावला आहे की ती बॉलिवूडच्या कपूर फॅमिलिची क्लोज फ्रेंड आहे

  • Share this:

मुंबई, 14 मे : आपल्या पर्सनल लाइफबद्दल बोलणं नेहमीच टाळणारा अभिनेता राणा दग्गुबती यांनं 12 मे ला त्याच्या लाइफमधला सर्वात मोठा खुलासा केला. त्यानं पहिल्यांदाच त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत सर्वांसमोर रिलेशनशिपची कबुली दिली. त्यानं गर्लफ्रेंड मिहिका बजाजसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यावर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी त्याला शुभेच्छा दिल्या. काहींना त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल जाणून घ्यायचं आहे. तर काहींनी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अंदाज लावला होता की ती बॉलिवूडच्या कपूर फॅमिलिची क्लोज फ्रेंड आहे मात्र आता सोनम कपूरनं तिच्या पोस्टमधून सर्वांचे गैरसमज दूर केले आहेत.

सोनमला जसं राणा आणि मिहिका बजाजच्या साखरपुड्याबद्दल समजलं तसं तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मिहिकाला शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये सोनमचं मिहिकावर किती प्रेम आहे हे दिसून येत याशिवाय तिनं राणाचं सुद्धा फॅमिलीमध्ये स्वागत केलं आहे. यावरुन दिसून येत की सोनम मिहिकाला आपल्या बहीणीप्रमाणे मानते. सोनमनं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, प्रिय बेबी मिहिका तुला खूप साऱ्या शुभेच्छा मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तू सुद्धा बेस्ट डिझर्व करतेस.

आपल्या पोस्टमध्ये सोनमनं राणासाठी मेसेज लिहिला, चांगलं होईल की राणा दग्गुबती तुला खूश ठेवेल तुम्हाला दोघांनाही खूप सारं प्रेम. फॅमिलीमध्ये तुझं स्वागत आहे राणा. या पोस्टवरुन स्पष्ट होतं की सोनम तिची बहीण रिया एवढंच प्रेम मिहिकावरही करते. याशिवाय सध्या मिहिकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात ती सोनमला वाढदिवसांच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. यात तिनं त्यांच्या कामाच्या आणि एकत्र वेळ घालवलेल्या आठवणींना उजाळा दिला आहे.

या दोघींच्या बॉन्डिंगवरुन दिसून येतं की सोनम राणा दग्गुबतीची मेहुणी होणार आहे. राणा आणि मिहिकाच्या साखरपुड्याची बातमी ऐकताच सोनम खूप आनंदात दिसत आहे. मिहिका बद्दल बोलायचं तर ती एक प्रसिद्ध बिझनेस वुमन आहे. ती इंटिरिअर आणि इव्हेंट प्लानर म्हणून काम पाहते. मुंबईमध्ये तिचा स्वतःचा स्टुडिओ सुद्धा आहे.

First published: May 14, 2020, 8:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading