मुंबई, 24 ऑगस्ट- ‘बिग बॉस 14’ फेम सोनाली फोगाटचं काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या 41 वर्षांच्या होत्या. सोनाली फोगाट तिच्या टीमसोबत गोव्यात होती. सोनालीने पंजाबी आणि हरियाणी चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं आहे. भारतात टिकटॉकवर बंदी येण्यापूर्वी ती यावर स्टार होती. अभिनेत्रीचे रील्स आणि व्हिडीओ खूप पसंत केले जात होते. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या मृत्यूच्या काही वेळेपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सोनाली फोगाट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत होती. तिच्या प्रत्येक पोस्टला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि केमन्ट्ससुद्धा मिळत असत. काल सोनाली फोगाटने अचानक या जगाचा निरोप घेतला. या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. ही अभिनेत्री आता या जगात नाही यावर विश्वास ठेवणं तिच्या चाहत्यांना कठीण जात आहे. कारण मृत्यूच्या काही वेळेपूर्वीच अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. सोनालीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता, वास्तविक हा व्हिडीओ एक इन्स्टा रील आहे. यामध्ये सोनालीने डोक्यावर फेटा बांधलेला दिसून येत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला ‘चेहरा जरा दिखा दो मेरे हुजूर का..’ हे सदाबहार गीत ऐकायला मिळत आहे. या रिलमध्ये सोनाली तोंडावर लावलेला फेट्याचा पदर काढताना दिसून येत आहे. परंतु या पोस्टच्या काही तासानंतरच अभिनेत्रीचं निधन आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
**(हे वाचा:** Sonali Phogat : ‘तिच्या जेवणात काही तरी…’; सोनाली फोगटच्या मृत्यूनंतर बहिणीचा खळबळजनक आरोप ) ‘बिग बॉस’मुळे सोनाली फोगाट घराघरात पोहोचली होती. या शोमध्ये बऱ्याचवेळा ती वादातसुद्धा अडकली होती. तसेच अनेक कलाकरांसोबत तिची चांगली मैत्रीदेखील झाली होती. अभिनेता अली गोनीसोबत तिचं छान बॉन्डिंग आलं होतं. अलीसोबत तिने अनेक मजेशीर गोष्टीदेखील शोमध्ये केल्या होत्या. तसेच राखी सावंतसोबतसुद्धा तिची चांगली मैत्री दिसून आली होती.