मुंबई, 2 सप्टेंबर- भाजप नेत्या आणि ‘बिग बॉस’ फेम सोनाली फोगटच्या मृत्यूप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सुरुवातीला हा एक नैसर्गिक मृत्यू असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. परंतु नंतर कुटुंबियांच्या आरोपांनंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. हा नैसर्गिक मृत्यू नसून खून असल्याचा संशय आहे. त्या दिशेने सध्या तपास सुरु आहे. दरम्यान पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये काही धक्कादायक गोष्टी आढळल्याचं समोर आलं आहे. आज तकने नुकतंच एक रिपोर्ट शेअर केला आहे. त्यामध्ये सोनाली फोगटच्या बॉडीचा पोस्टमार्टम करणाऱ्या एका सीनियर डॉक्टरने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आज तकच्या वृत्तानुसार, सोनालीच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला त्यांचं पोस्टमार्टम करण्यासाठी परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे मृत्यूच्या दोन दिवसांनंतर त्यांचं पोस्टमार्टम करण्यात आलं होतं. या टीममधील एका डॉक्टरचा व्हिडीओ लीक झाला आहे. त्यानुसार, सोनालीच्या पोस्टमार्टममध्ये तिच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या होत्या. मात्र नंतर रिपोर्टमध्ये नैसर्गिक मृत्यू इतकी एकच ओळ पाहायला मिळाली होती. या रिपोर्टनुसार, सोनाली यांच्या शरीरावर सर्वत्र जखमांचे व्रण होते. त्यांच्या हाता-पायांच्या भोवती, मांड्यांवर अशा सर्व ठिकाणी हे व्रण आढळून आले होते. त्यासोबतच पोस्टमार्टममध्ये सोनालीच्या शरीरात ड्रग्ससुद्धा आढळून आले आहेत. या वृत्तामध्ये आणखी एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या डॉक्टरला जेव्हा पत्रकाराने विचारलं, हार्ट अटॅकचं काय झालं. यावर त्यांनी उत्तर देत म्हटलं, यामध्ये हार्ट अटॅकचं काहीही नाहीय, ते फक्त आम्ही तपासणीसाठी ठेवलं आहे. या नव्या खुलास्याने हे प्रकरण आणखी गंभीर बनलं आहे. **(हे वाचा:** Sonali Phogat: धक्कादायक! सोनाली फोगाटच्या शरीरावर आढळले 46 व्रण,समोर आली मोठी माहिती ) दरम्यान, सोनालीच्या कुटुंबियांनी ज्या कॉम्प्युटर ऑपरेटरवर सोनालीच्या ऑफिसमधील मोबाईल, लॅपटॉप, सीसीटीव्ही आणि इतर साहित्य चोरी केल्याचा आरोप केला होता. त्या कॉम्प्युटर ऑपरेटर शिवमला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हरियाणा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याआधी पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये सोनाली फोगटचा पीए सुधीर सांगवान, मित्र सुखविंदर सिंह,ड्रग्स पेडलर, हॉटेल मालक, आणि ड्रग्स तस्कर यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.