मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sonalee Kulkarni: सिनेसृष्टीतील 'ही' अभिनेत्री आहे सोनालीची बेस्ट फ्रेंड; फोटो शेअर करत म्हणाली 'नवदुर्गा'

Sonalee Kulkarni: सिनेसृष्टीतील 'ही' अभिनेत्री आहे सोनालीची बेस्ट फ्रेंड; फोटो शेअर करत म्हणाली 'नवदुर्गा'

सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी

देशभरात सध्या नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. सर्व सामान्य लोकांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वजण देवीचा जागर करत आहेत. या नऊ दिवसांच्या काळात स्त्री शक्तीचा जागर केला जातो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 1 ऑक्टोबर-  देशभरात सध्या नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. सर्व सामान्य लोकांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वजण देवीच्या भक्तीत दंग आहेत.  या नऊ दिवसांच्या काळात स्त्री शक्तीचा जागर केला जातो. या उत्सवाच्या माध्यमातून समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्त्रियांच्या धैर्याला आणि जिद्दीला सलाम केला जातो. आज अनेक लोक आपल्या आयुष्यातील नवदुर्गांची ओळख करुन देत आहेत. यामध्ये सेलिब्रेटीसुद्धा मागे नाहीत.

मराठमोळी अप्सरा अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचासुद्धा यामध्ये समावेश आहे. नवरात्र उत्सव सुरु झाल्यापासून सोनाली कुलकर्णी सतत सोशल मीडियावर आपल्या नवदुर्गांची ओळख करुन देत आहे. सोनालीने अनेक फोटो शेअर करत आपल्या आयुष्यात आपल्यासोबत खंबीरपणे उभ्या असणाऱ्या स्त्रियांची ओळख करुन दिली आहे. सोनाली कुलकर्णीच्या या पोस्ट सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. चाहते या पोस्टना भरभरुन प्रेम देत आहेत.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यातील विविध गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोनालीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताच व्हायरल होतात.. तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांना अभिनेत्रीबाबत लहान-लहान गोष्टी जाणून घ्यायला आवडतं. त्यामुळे चाहते सतत सोनालीच्या सोशल मीडियावर लक्ष ठेऊन असतात. आजही अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाहूया अभिनेत्रीने नेमकं काय लिहलंय.

सोनाली कुलकर्णीने नुकतंच आपल्या लग्नातील एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती आपली मैत्रीण आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरेसोबत दिसून येत आहे. प्रार्थनासोबतच फोटो शेअर करत सोनालीने तिला आपली नवदुर्गा म्हटलं आहे. सोनाली आणि प्रार्थना या दोघी घट्ट मैत्रिणी आहेत. हे सर्वांनाच माहिती आहे. त्या सतत एकत्र दिसून येतात. नुकतंच सोनालीच्या लग्नामध्ये मराठी इंडस्ट्रीमधीलकेवळ एकच मैत्रीण-अभिनेत्री उपस्थित होती ती म्हणजे प्रार्थना बेहेरे. यावरुनच या दोघींचं नातं किती घट्ट आहे याचा अंदाज येतो.

(हे वाचा:Nagraj Manjule: नागराज मंजुळेंची मोठी घोषणा; 'नाळ 2' बाबत महत्त्वाची अपडेट )

सोनालीने फोटो शेअर करत लिहलंय, 'मराठी चित्रपट सृष्टीतील माझी बेस्ट फ्रेंड प्रार्थना बेहेरे. माझी मितवा, माझी सुख-दुःखातील मैत्रीण. सिनेमा करणे ते बघणे..बॉयफ्रेंड ते नवरा... मेकअप ते स्किन केअर..कुटुंब ते खाद्यपदार्थ असे अनेक विषय मी फक्त जिच्याबरोबर शेअर करते. अशी माझी मितवा. माझी नवदुर्गा'. असं म्हणत सोनालीने आपल्या आयुष्यातील प्रार्थना बेहेरेचं महत्व अधोरेखित केलं आहे. सोनाली आणि प्रार्थनाने 'मितवा' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटापासूनच त्यांच्यात खूप छान मैत्री जमली होती.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Sonalee Kulkarni