जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sonalee Kulkarni: सीजनची पहिली आमरस पुरी 'या' सेलिब्रेटीच्या घरी खाते सोनाली, शेअर केला धम्माल VIDEO

Sonalee Kulkarni: सीजनची पहिली आमरस पुरी 'या' सेलिब्रेटीच्या घरी खाते सोनाली, शेअर केला धम्माल VIDEO

सोनाली कुलकर्णीने पहिल्यांदा बनवली आमरस पुरी

सोनाली कुलकर्णीने पहिल्यांदा बनवली आमरस पुरी

Sonalee Kulkarni News: सध्या आंब्यांचा सीजन सुरु झाला आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वजणच आमरस पुरीच्या प्रेमात पडलेले दिसून येत आहेत.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,15 एप्रिल- सध्या आंब्यांचा सीजन सुरु झाला आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वजणच आमरस पुरीच्या प्रेमात पडलेले दिसून येत आहेत. अनेकजण या सीजनची आवर्जून वाट पाहात असतात. मराठी सिनेसृष्टीत असेही काही सेलिब्रेटी आहेत ज्यांना आमरस पुरी प्रचंड आवडते. यामध्ये मराठमोळी अप्सरा सोनाली कुलकर्णी चादेखील समावेश होतो. सोनाली कुलकर्णीने नुकतंच आपलं आमरस प्रेम व्यक्त केलं आहे. इतकंच नव्हे तर अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करत सीजनची पहिली आमरस पुरी ती कोणाच्या घरी खाते याचाही खुलासा केला आहे. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोनालीची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे. सोनालीचे चाहते सतत तिच्या पोस्टच्या प्रतीक्षेत असतात. सोनालीसुद्धा सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्याबाबत अपडेट देत असते.

News18लोकमत
News18लोकमत

सोनालीच्या प्रत्येक पोस्टवर चाहते तितकंच प्रेम करतात. अभिनेत्री शुटिंगमधून वेळ काढून सतत कुटुंब आणि मित्रांसोबत धम्माल करताना दिसून येते. आजसुद्धा अभिनेत्रीची पोस्ट अशीच काहीशी आहे. (हे वाचा: Sayali Sanjeev: ‘तुम्ही जे बोलता…’, सुषमा अंधारेंबाबत सायली संजीवचं ‘ते’ विधान चर्चेत ) मराठी इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत जे एकमेकांचे जिवलग मित्र आहेत. यामध्ये सोनाली कुलकर्णी आणि फुलवा खामकरचादेखील समावेश होतोय. सोनाली आणि फुलवा फारच छान मैत्रिणी आहेत. या दोघी सतत एकमेकांसोबतचे डान्सचे किंवा धम्माल करतानाचे व्हिडीओ शेअर करत असतात. या व्हिडीओमधून या दोघींचं बॉन्डिंग स्पष्ट दिसून येतं. दरम्यान आता सोनाली कुलकर्णीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सोनाली आणि फुलवा आमरस पुरी बनवण्याची तयारी करत असल्याचं दिसून येत आहे. सोनाली कुलकर्णीने व्हिडिओ शेअर करत सांगितलं आहे की, तिला आमरस पुरी प्रचंड आवडते. आणि ती सीजनची पहिली आमरस पुरी मराठमोळी कोरिओग्राफर आणि तिची मैत्रीण फुलवा खामकरच्या घरी खाते. हा तिचा दरवर्षीचा ठरलेला क्रम आहे. व्हिडीओमध्ये फुलवा आणि सोनाली आंबे पिळून आमरस करताना दिसून येत आहेत. सोनालीने आपण पहिल्यांदाच आमरस बनवणार असल्याचंही म्हटलं आहे. शिवाय सोनालीने गृहिणींसाठी एक खास सल्लाही दिला आहे. आंबे फ्रिजमध्ये कधीही ठेऊ नये कारण गारमुळे त्याची चव कमी होते असंही सोनलीने सांगितलं आहे.

जाहिरात

सोनाली कुलकर्णी मराठीसोबतच आता साऊथ सिनेसृष्टीत आपली जादू पसरवण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री लवकरच ‘मलेकोटे वालिवन’ या साऊथ सिनेमात झळकणार आहे. नुकतंच अभिनेत्रीने या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. या सिनेमात सोनाली साऊथ सुपरस्टार मोहनदाससोबत झळकणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात