मुंबई, 12 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो चाहत्यांसोबत अनेक फोटो शेअर करत असतो. अशातच अभिषेकने वडिल बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटो शेअर केला आहे. त्याच्या नव्या पोस्टने सध्या अनेकांचं लक्ष वेधलं असून ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अभिषेक बच्चनने शेअर केलेल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये दोन फोटोंचा कोलाज दिसत आहे. त्यामधील एक फोटो त्याचा लहानपणीचा आहे आणि एक आत्ताचा. या फोटोतून त्यानं एक सुंदर आठवण शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. थ्रोबॅक चित्रात, अमिताभ बच्चन अभिषेक बच्चनला काहीतरी शिकवताना दिसत आहेत तर दुसऱ्या चित्रात बिग बी खुर्चीवर बसले आहेत आणि अभिषेक त्यांच्या मागे उभा आहे. या सुंदर पोस्टनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
View this post on Instagram
अभिषेकने फोटोसोबत एक हृदयस्पर्षी कॅप्शनही शेअर केलं आहे. 'काही गोष्टी कधीही बदलत नाहीत! त्यांच्या सेटवर सरप्राईज व्हिजिट हे नेहमीच माझ्या आवडत्या गोष्टींपैकी एक राहिली आहे. अभिषेकच्या कॅप्शनने खरंच काही गोष्टी बदलत नसल्याचं वाटत आहे.
हेही वाचा - 200 कोटी प्रकरणात Jacqueline Fernandez ला पुन्हा समन्स; आधी दोन्ही वेळस गैरहजर
दरम्यान, अभिषेक अनेकदा चाहत्यांना त्याच्या कौटुंबिक वेळ, चित्रपटांचे शूटिंग आणि इतर प्रोजेक्ट्सबद्दल अपडेट करतो. अमिताभ बच्चनही अनेकवेळा अभिषेकसोबत पोस्ट शेअर करत त्याची प्रशंसा करताना दिसतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Abhishek Bachchan, Amitabh Bachchan, Bollywood, Instagram post