‘कधीही फोन कर धावत येईन’; ...म्हणून सोहेल खाननं दिलं राखी सावंतला वचन

‘कधीही फोन कर धावत येईन’; ...म्हणून सोहेल खाननं दिलं राखी सावंतला वचन

राखीच्या आईचा व्हिडीओ पाहून सोहेल खान भावूक झाला अन् त्याने देखील “तू कधीही फोन कर वाट्टेल ती मदत करेन” असं वचन राखीला दिलं आहे.

  • Share this:

मुंबई 27 फेब्रुवारी : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या आपल्या आईमुळं प्रचंड चर्चेत आहे. राखीची आई कर्करोगग्रस्त असून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. या उपचारांसाठी अभिनेता सलमान (Salman Khan) आणि सोहेल खान (Sohail Khan) यांनी तिला आर्थिक मदत केली होती. या मदतीसाठी राखीच्या आईनं दोघांचे आभार मानले. मात्र आईचा व्हिडीओ पाहून सोहेल खान भावूक झाला अन् त्याने देखील “तू कधीही फोन कर वाट्टेल ती मदत करेन” असं वचन राखीला दिलं आहे.

राखी सध्या आपल्या आईच्या उपचारामुळं मानसिक तणावाखाली आहे. या परिस्थितीत सोहेलनं एका व्हिडीओद्वारे तिचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. “राखी तू काळजी करु नकोस मी तुझ्यासोबत आहे. जेव्हा कधी तुला मदत हवी असेल तेव्हा तू मला थेट फोन कर. मी तुझ्या आईला भेटलेलो नाही. पण तुझी आई नक्कीच तुझ्यासारखी धाडसी आहे त्यामुळं इतक्या मोठ्या आजाराचा सामना करतानाही तिनं आपलं धैर्य गमावलेलं नाही. आई लवकर बरी होईल. माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत.” अशा आशयाचा संदेश सोहेलनं राखीला दिला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

राखीची आई जया या गेली अनेक वर्ष कर्करोगामुळं त्रस्त आहेत. आर्थिक अडचणींमुळे त्यांचा योग्य प्रकारे उपचार होत नव्हता. परंतु अखेर सलमान राखीच्या मदतीला धावून आला. त्यानं आईच्या केमो थेरेपीसाठी लाखो रुपयांची मदत केली. या मदतीसाठी राखीनं सलमानचे आभार मानले.

तिनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन सलमानची प्रचंड स्तुती केली आहे. “सलमान भाई तू रॉकस्टार आहेस. तू आम्हाला खूप मदत केलीस. आम्ही कायम तुझे ऋणी राहू. माझ्या आईची केमो थेरेपी सुरु आहे. चारपैकी दोन थेरपी झाल्या आहेत. आई आता हळूहळू पहिल्यासारखी तंदुरुस्त होतेय.” अशा आशयाची वक्तव्य करत राखीनं सलमानचे आभार मानले.

Published by: Mandar Gurav
First published: February 27, 2021, 5:01 PM IST

ताज्या बातम्या