मुंबई 12 एप्रिल**:** महेश काळे (Mahesh Kale) हा सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय शास्त्रीय गायकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सध्याच्या काळात धांडगधिंगाणा असलेली गाणी जास्त लोकप्रिय झालेली दिसतात. मात्र त्याही परिस्थितीत महेश काळे आपल्या जबरदस्त गायन शैलीच्या जोरावर रसिकांना भूरळ पाडताना दिसतो. (Singer Mahesh Kale) त्याच्या लाईव्ह कार्यक्रमांना देखील प्रेक्षकांची अफाट गर्दी होते. काही जण तर महेशची तुलना प्रख्यात गायक भीमसेन यांच्याशी देखील करतात. मात्र ही तुलना काही रसिकांना आवडलेली नाही. (Mahesh Kale song) “तू तर नाकात गातोस तू कसा भीमसेन” असं म्हणत या टीकाकारांनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानं देखील फार संयमानं या टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे. अवश्य पाहा -
ही अभिनेत्री होती Dharmendra याचं first love; तिला इम्प्रेस करायला झाले होते हिमॅन अलिकडेच आपला एक फोटो फेसबुकवर शेअर केला होता. या फोटोवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. मात्र काही टीकाकारांनी या फोटोखाली त्याच्या गायन शैलीबाबत आपली नाराजी व्यक्त केली. एका युजरनं तर “भिमसेन एकच होऊ शकतात… तू तर नाकात गातो एवढं कर्कश कोण ऐकतं कोण तूला…” अशा शब्दात त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यावर महेशनं देखील फार संयमान प्रत्युत्तर दिलं. “खरं आहे, एकच होऊ शकतात ते. असाच आवाज देवाने दिला आहे तर काय करु आता. मला पण कळत नाही का आवडतो लोकांना ते. तुम्ही सुखरुप रहा.” असं तो म्हणाला. त्याच्या या उत्तरावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे. त्याची ही पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.