मुंबई, 15 जून : घरात नवा पाहुणा येणार, आपण आई-वडिल होणार हा क्षण प्रत्येक कपलसाठी महत्त्वाचा असतो. या क्षणाची ते आतुरतेने वाट पाहत असतात. अशाच छोट्याशा पाहुण्याची वाट पाहणाऱ्या एका प्रसिद्ध गायकावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जगात येताच त्याचा बाळाने जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. गायक बी प्राकच्या बाळाचा जन्मताच मृत्यू झाला आहे
(Singer B Praak's baby died).
बी प्राक आणि त्याची बायको मीरा बच्चन यांचं हे दुसरं बाळ. दुसऱ्यांदा आईबाबा होण्याचा आनंद त्यांना होता. पण त्यांचा हा आनंद काही क्षणापुरताच राहिला. जन्मावेळीच त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. बी प्राकने स्वतः आपल्या सोशल मीडियावर ही दुःखद बातमी दिली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट केली आहे
बी प्राक म्हणाला, "अतिशय दुःखद, वेदनादायी मनाने मला हे सांगावं लागतं आहे की आमच्या नवजात बाळाचा जन्मावेळी मृत्यू झाला आहे. पालक म्हणून आम्ही सर्वात वेदनादायी अशा परिस्थितीतून जात आहोत. शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. आम्ही जे गमावलं आहे, त्यामुळे आम्ही कोलमडलो आहोत. या क्षणी आम्हाला प्रायव्हसी द्या, असं आम्ही आवाहन तुम्हा सर्वांना करत आहोत"
बी प्राक आणि मीराने 4 एप्रिल 2019 ला लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगा आहे, ज्याचं नाव अदब आहे. 4 एप्रिल, 2022 ला बी प्राकने आपण दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती.
पत्नी मीरासोबत त्याने आपला फोटो शेअर केला होता. ज्यात त्याची बायको बेबी बम्प दाखवताना दिसली होती.
हे वाचा - जेनेलियांनी सासरे विलासराव देशमुख यांची शेअर केली खास आठवण, कॅप्शननं वेधलं लक्ष
बी प्राक हा हिंदी आणि पंजाबी गायक आहे. अक्षय कुमारची फिल्म केसरीमधून त्याने हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. या फिल्ममधील तेरी मिट्टी हे गाणं त्याने गायलं आहे. या गाण्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.