'दहशत नाही शांतता पसरवा' गायक अदनान सामीने पाकिस्तानला सुनावले खडे बोल
पाकिस्तानी (Pakistani) नेटकरी बरेचदा भारतीय कलाकारांना (Indian Celebrities) सोशल मीडियावर (Social Media) ट्रोल करतात. पण यावेळी गायक अदनान सामीने (Adnan Sami) पाकिस्तानी ट्रोलर्सना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
मुंबई, 19 डिसेंबर: प्रसिद्ध गायक (Singer) आणि संगीतकार अदनान सामी (Adnan Sami) सोशल मीडियावर (Social Media) कायम अॅक्टिव असतो. तो अगदी उघडपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली मतं मांडतो.अदनान ट्रोलिंगकडे (Trolling) अजिबात दुर्लक्ष करत नाही. तो ट्रोलर्सना त्यांच्याच शब्दात योग्य उत्तर देतो. अलीकडे अदनान सामी यांनी एक ट्वीट (Tweet) केले, ज्यावरून तो ट्रोल (Troll) होऊ लागला. ट्रॉलिंग करणारे बहुतेक लोक पाकिस्तानचे (Pakistan) होते.
भारत पाकिस्तान युद्ध 1971 ला नुकतेच 50वर्ष पूर्ण झाली. बऱ्याच भारतीयांनी (Indian) आपल्या सोशल मीडियावर या ऐतिहासिक घटनेबद्दल पोस्ट करत आठवणींना उजाळा दिला. गायक अदनान सामीनेदेखील त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओला अदनाने कॅप्शन दिल आहे , 'तुम्हाला लक्षात असो वा नसो पण मला सगळं आठवतं'. अदनानच्या या ट्वीटला अगदी काहीच वेळात हजारहून अधिक लाईक्स (Likes) आले. पण सोबतच काही नेटकरी पोस्ट केलेल्या या व्हिडीओवरून अदनानला ट्रोल करू लागले. अदनानच्या या पोस्टवर कंमेंट करत नेटकरी म्हणाले ' प्रेम पसरवण्याचा प्रयत्न करा'. यातले बरेच ट्रोलर्स पाकिस्तानचे होती. या ट्रोलर्सच्या कंमेंट्स वाचून असं वाटत होते की त्यांनी अदनानला टार्गेटच केलं आहे.
“Mujhe Sab Hai Yaad Zara Zara, Tumheñ Yaad Ho Ki Na Yaad Ho!”
पण अदनाननेही या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष न करता ह्याची चांगलीच शाळा घेतली. या ट्रोलर्सला प्रत्त्युत्तर देत अदनान म्हणाला, 'मी नेहमीच प्रेम पसरवतो, माझी गाणी ऐकली नाही का?' प्रेम लोकांना वाटा असा मला सल्ला देण्यापेक्षा 'तुम्हीच शांतता पसरवा, दहशत नाही' असे खडे बोल अदनानने या ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना सुनावले. 'अदनानच्या प्रतिक्रियेला भारतीय नेटकऱ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे . एका व्यक्तीने अदनांच्या पोस्टवर लिहिले, 'अदनान नेहमीच प्रेम पसरवतो आणि भारताकडे अदनान सामीसारखा गायक असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
“Mujhe Sab Hai Yaad Zara Zara, Tumheñ Yaad Ho Ki Na Yaad Ho!”
अदनान मूळचा पाकिस्तानचा नागरिक असला तरी 4 वर्षांपूर्वीच अदनानला भारतीय नागरिकत्व (Indian Citizenship) मिळालं आहे. तसेच अदनानला या वर्षीच पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अदनानने आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.