मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sidhu Moosewala: सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणाची नवी अपडेट, लॉरेन्स बिश्नोईच्या भाच्याला विदेशात अटक

Sidhu Moosewala: सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणाची नवी अपडेट, लॉरेन्स बिश्नोईच्या भाच्याला विदेशात अटक

  सिद्धू मुसेवाला हत्या प्ररकरणात आता नवी माहिती समोर आली आहे.

सिद्धू मुसेवाला हत्या प्ररकरणात आता नवी माहिती समोर आली आहे.

सिद्धू मुसेवाला हत्या प्ररकरणात आता नवी माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 30 ऑगस्ट-  सिद्धू मुसेवाला हत्या प्ररकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात विदेशातसुद्धा कारवाईला सुरुवात झाली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाचा सचिन बिश्नोईला अटक करण्यात आली आहे. अजरबैजानमध्ये पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. लॉरेन्सच्या गॅंगला सचिन बिश्नोई बाहेरुन ऑपरेट करत असल्याचं सांगितलं जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, तपास एजन्सींनी दावा केला आहे की, पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा भाचा सचिन बिश्नोईचादेखील हात आहे. लॉरेन्स बिश्नोई गॅंग सिद्धू मुसेवालाची हत्या करणार असल्याची माहिती सचिन बिश्नोईला सुरुवातीपासूनच असल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. इतकंच नव्हे तर सचिन बिश्नोईलाच या हत्येचा मास्टरमाईंड म्हटलं जात आहे.

नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, सचिन बिश्नोईजवळ नकली पासपोर्ट आढळून आला आहे. सचिनचं पूर्ण नाव सचिन थापन असल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतु त्याच्याजवळ तिलक राज टूटेजा नावाचा पासपोर्ट आढळून आला आहे. सचिन बिश्नोईच्या वडिलांचं खरं नाव शिव दत्त असं आहे. परंतु मिळालेल्या नकली पासपोर्टवर त्याच्या वडिलांचं नाव भीम सेन असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर सचिन बिश्नोईने आपल्या या पासपोर्टवर पत्तादेखील खोटा दिला आहे.

(हे वाचा:KRK: दोन वर्षांपूर्वीच ते ट्विट पडलं महागात; केआरकेला झाली अटक )

यापूर्वी पोलिसांनी आपल्या रिपोर्ट्समध्ये दावा केला होता की, लॉरेन्स बिश्नोईचा भाचा सचिन बिश्नोईच्या सांगण्यावरुनच त्याचा मित्र संदीप केकडा सिद्धूला भेटण्यासाठी गेला होता. तो सिद्धूचा चाहता बनून त्याच्या घरी पोहोचला होता. त्याने सिद्धूसोबत सेल्फीसुद्धा घेती होती. बराचवेळ तो गायकाच्या घरी होता. जेव्हा सिद्धू घरातून बाहेर पडला, तेव्हा त्याने ती सर्व माहिती पुढे आरोपींना दिली होती. त्यानंतर आधीच डुख धरून बसलेल्या शूटर्सनी संधी साधत सिद्धू मुसेवालावर गोळ्या झाडल्या होत्या. या हत्या प्रकरणात कॅनडामधील गोल्डी बराडला मास्टरमाईंड समजलं जात आहे. तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा अत्यंत खास असल्याचं सांगितलं जातं. त्याने आपला मित्र विक्की मिद्दुखेडाच्या मृत्यूचा बदल घेण्यासाठी हा कट रचल्याचं म्हटलं जातं.

First published:

Tags: Entertainment, Panjab, Singer