मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sidharth Shukla बनला 2021चा मोस्ट सर्चेबल सेलेब्रिटी; पाहा LIST मध्ये आहे आणखी कोणाचा समावेश

Sidharth Shukla बनला 2021चा मोस्ट सर्चेबल सेलेब्रिटी; पाहा LIST मध्ये आहे आणखी कोणाचा समावेश

सिद्धार्थ शुक्ला   (Sidharth Shukla)   हे या वर्षी (२०२१) सर्वाधिक शोधले गेलेले भारतीय सेलिब्रिटी आहेत. ज्यांचे २ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) हे या वर्षी (२०२१) सर्वाधिक शोधले गेलेले भारतीय सेलिब्रिटी आहेत. ज्यांचे २ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) हे या वर्षी (२०२१) सर्वाधिक शोधले गेलेले भारतीय सेलिब्रिटी आहेत. ज्यांचे २ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 4 डिसेंबर-   सिद्धार्थ शुक्ला   (Sidharth Shukla)   हे या वर्षी (२०२१) सर्वाधिक शोधले गेलेले भारतीय सेलिब्रिटी आहेत. ज्यांचे २ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. खरं तर, Yahoo ने गुरुवारी (3 डिसेंबर) भारतासाठी 2021 'इयर इन रिव्ह्यू'  (YIR)  जारी केला. जो एक प्रकारचा डेटा आहे. जो वापरकर्ते, टॉप सेलेब्स, वर्षातील बातम्या निर्मात्यांच्या दैनंदिन शोधाच्या सवयीवर आधारित आहे.

सिद्धार्थ शुक्ला हा सर्वाधिक सर्च केलेला मेल सेलिब्रिटी आहे-

सिद्धार्थ शुक्ला आणि कन्नड चित्रपट स्टार पुनीत राजकुमार हे भारतातील दोन तरुण सेलिब्रिटी होते ज्यांचे २०२१ मध्ये निधन झाले. या दोन्ही स्टार्सच्या चाहत्यांनी त्यांना ऑनलाइन खूप सर्च केले होते. २०२१ मध्ये सिद्धार्थ शुक्ला हा भारतातील सर्वाधिक सर्च केलेला मेल सेलिब्रिटी होता. तर पुनीत राजकुमार या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत सलमान खान आणि अल्लू अर्जुन यांनी दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे.

करीना कपूर खानने यावर्षी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. या वर्षी तिने 'द प्रेग्नन्सी बायबल' या पुस्तकाचे प्रकाशन करून एक लेखिका म्हणून तिची उपस्थिती जाणवून दिली. ती 2021 मध्ये भारतातील सर्वाधिक शोधलेली फिमेल सेलिब्रिटी आहे. 'सूर्यवंशी'च्या यशामुळे आणि लग्नाच्या बातम्यांमुळे कतरिना कैफ नंबर 2 वर राहिली.अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस (क्रमांक 3), आलिया भट्ट (क्रमांक 4) आणि दीपिका पदुकोण (क्रमांक 5) या भारतातील सर्वाधिक शोधल्या गेलेल्या फिमेल सेलिब्रिटींमध्ये होत्या. व्यावसायिक आणि वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत असलेली समंथा रुथ प्रभू यंदाच्या यादीत दहाव्या क्रमांकावर होती. 'द फॅमिली मॅन 2' मधील भूमिकेसाठी तिने खूप प्रशंसा मिळवली. अभिनेत्रीने अभिनेता नागा चैतन्यपासून वेगळे झाल्याची माहिती दिली होती.

क्रीडा व्यक्तिमत्त्वात विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे

यंदाच्या यादीत क्रिकेटपटू आणि ऑलिम्पिक स्टार्सचा दबदबा आहे. विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. तर क्रिकेटर एमएस धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. ट्रॅक आणि फील्डमध्ये भारताचा पहिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा पहिल्या क्रमांकावर होता. ऑलिम्पिक पदक विजेती आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू ७ व्या क्रमांकावर होती. सचिन तेंडुलकर (क्रमांक 4), रोहित शर्मा (क्रमांक 5), ऋषभ पंत (नंबर 8) आणि केएल राहुल (क्रमांक 10) या स्टार्सने आपले स्थान निर्माण केले.ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमार खून प्रकरणात अटक झाल्याच्या बातमीनंतर 9व्या क्रमांकावर होता.

सर्वाधिक शोधलेले व्यक्तिमत्व

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वाधिक सर्च केलेले व्यक्तिमत्त्व आहे. विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला चौथ्या क्रमांकावर राहिला. यंदाच्या यादीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला सातवे स्थान मिळाले आहे.

First published:

Tags: Entertainment, Sidharth shukla