मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Shubh Mangal Zyada Saavdhan Trailer : गे कपल असलेल्या आयुष्मान-जितेंद्रचा लिपलॉक KISS आणि ड्रामा!

Shubh Mangal Zyada Saavdhan Trailer : गे कपल असलेल्या आयुष्मान-जितेंद्रचा लिपलॉक KISS आणि ड्रामा!

आयुष्मान खुरानाचा बहुचर्चित शुभ मंगल ज्यादा सावधान सिनेमा 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

आयुष्मान खुरानाचा बहुचर्चित शुभ मंगल ज्यादा सावधान सिनेमा 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

आयुष्मान खुरानाचा बहुचर्चित शुभ मंगल ज्यादा सावधान सिनेमा 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
मुंबई, 20 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना एकापाठोपाठ सात हिट चित्रपट दिल्यानंतर आता आणखी एक चित्रपट घेऊन येत आहे. आयुष्मान खुरानाचा शुभ मंगल ज्यादा सावधान (Shubh Mangal Zyada Saavdhan) या बहुप्रतिक्षित सिनेमाचा ट्रेलर अखेर लॉंच झाला आहे. या ट्रेलरमध्ये एका समलैगींक कपल (गे) ची (आयुष्मान आणि जितेंद्र) यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. आयुष्मानचा हा हा चित्रपट देखील कौटुंबिक करमणूकीचा असून हा विनोदी चित्रपट आहे. आनंद एल राय यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'शुभ मंगल ज्यादा सावधान’ (Shubh Mangal Zyada Saavdhan) चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर आयुष्मान खुरानाचे चाहते चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. हा चित्रपट 21 फेब्रुवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. आयुष्मान या चित्रपटात गे व्यक्तीची भुमिका साकारत आहे. या चित्रपटात समलैंगिक प्रेमकथा दाखविली जाईल. या चित्रपटात आयुष्मान पहिल्यांदा खुराना गेची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात नीना गुप्ता आणि गजराज राव पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. त्यांच्यासोबत सुनिता राजवार, मानवी गगारू, पंखुडी अवस्थी, नीरज सिंग, मनु ऋषी चड्ढा हेही या चित्रपटात दिसणार आहेत.
First published:

Tags: Ayushmann Khurrana

पुढील बातम्या