मुंबई, 30 सप्टेंबर : आपल्या विनोदी शैलीनं सगळ्यांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. श्रेया झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत असते. या कार्यक्रमातून श्रेया घराघरांत पोहचली. श्रेया तिच्या हटके विनोदी शैलीने कायमच प्रेक्षकांना हसवत आली आहे. अशातच अनेकांच्या ओठांवर हसू उमटवणारी अभिनेत्री, कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे सध्या चर्चेचा विषय ठरतेय. तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे ती चर्चेत आली आहे. श्रेया बुगडेनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने वेस्टर्न पेहराव केल्याचं दिसतंय. तिने फोटो आणि छोट्या व्हिडीओंचा कोलाज केलेला व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष गोष्ट म्हणजे श्रेयाचा व्हिडीओ विनोदवीर कुशल बद्रिकेनं बनवला आहे. श्रेयानं भन्नाट कॅप्शन लिहित हा व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओ शेअर करत श्रेयानं लिहिलं की, ‘कुशल बद्रिकेने माझ्या फोन मधून माझे फोटो जबरदस्तीने घेऊन, त्याचा एक व्हिडीओ बनवला आहे, आणि मला तो पोस्ट करण्याची जबरदस्ती केली आहे, म्हणून मी हा व्हिडीओ पोस्ट करत आहे. पण तुम्हाला लाईक आणि कमेंट करण्याची जबरदस्ती तो करू शकत नाही. म्हणून मी देवाचे आभार मानते’. तिच्या या कॅप्शननं सगळ्यांचंच लक्ष केंद्रित केलं आहे.
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी श्रेया तिच्या विनोदी अंदाजामुळे तर चर्चेत असतेच मात्र सोशल मीडियावर तिच्या हटके स्टाईलमुळे अनेकदा चर्चेचा विषय ठरत असते. श्रेयानं चला हवा येऊ द्या कार्यक्रमामध्ये येण्यापूर्वी मालिकेत आणि वेबसिरीजमध्येही काम केलं आहे. श्रेयाचा चाहता वर्गही आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे तिचे फोटो, व्हिडीओ अगदी काही क्षणातच व्हायरल होतात.