staycation म्हणजे एखाद्या बाहेरच्या गोष्टी पाहण्याऐवजी घरीच बसून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करून एन्जॉय करणं.
जेव्हा बाहेर जायचं खूप प्लॅनिंग करावं लागत त्यापेक्षा एखाद्या घरासारख्या ठिकाणी वेगवेगळ्या धमाल गोष्टी करत सुट्टी घालवता येते.
आपल्या मित्रमंडळींसह श्रेया मस्त फिरायला गेली असून तिने बरीच धमाल केल्याचं फोटोमधून लक्षात येत आहे.
स्विमिंग पूल काही खास जवळचे मित्र आणि अप्रतिम view असणाऱ्या या ठिकाणचे तिने बरेच फोटो आणि सुंदर क्षण शेअर केले आहेत.
श्रेयाचे मराठी इंडस्ट्रीत बरेच मित्र आहेत. श्रेयसह अभिज्ञा भावे,अनुजा साठे, रेश्मा शिंदे असे सहकुटुंब या vacation ची मजा घेताना दिसत आहेत.
रोजच्या शूटिंगच्या घाईगडबडीतून एखादी रात्र अशी छोटीशी सुट्टी घेणं कायमच रिफ्रेशिंग असतं ज्याची मजा सध्या आपल्या मित्रांसह घेताना दिसतेय.