मुंबई, 28 ऑक्टोबर**:** बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. आणि विशेष म्हणजे श्रद्धा नागिणीच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. फिल्ममेकर निखिल द्विवेदी लवकरच नागिणीवर आधारित असलेला एक सिनेमा बनवणार आहेत. श्रद्धाने ही फिल्म करण्यास होकार दिला आहे. ही फिल्म मिळाल्यामुळे मी खूप खूश आहे. असी भावना श्रद्धाने व्यक्त केली. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी ‘नागिन’ या सिनेमामध्ये केलेली भूमिका अजरामर आहे. त्यामुळे श्रद्धालाही आपल्या करिअरमध्ये अशी भूमिका साकारायची होती अशी भावना तिने व्यक्त केली आहे. बॉलिवूडमध्ये नागिणीच्या भूमिकांचा ट्रेंड काही संपत नाही. या आधी श्रीदेवी, रेखा आणि रीना रॉय यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रींनी मोठ्या पडद्यावर नागिण साकारली होती. आता श्रद्धा कपूरला ही संधी मिळाली आहे. 2018मध्ये श्रद्धा कपूरने स्त्री या चित्रपटात साकारलेली भूमिकादेखील काहीशी वेगळ्या धाटणीची होती. तिने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. श्रद्धा आत्ता करत असलेल्या चित्रपटाचं नाव अजून ठरलेलं नाही.
श्रद्धाच्या नव्या सिनेमात स्पेशल इफेक्ट्स श्रद्धाच्या या सिनेमामध्ये अनेक स्पेशल इफेक्ट्सही पाहायला मिळणार आहेत. निखिल द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार ही एक लव्हस्टोरी आहे. आणि लवकरच फिल्मच्या शूटिंगलाही सुरुवात होणार आहे.