टीव्हीवरील 'पांड्या स्टोअर' या मालिकेतील अभिनेत्री सिमरन बुधरूपने धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने खुलासा करत सांगितलं की, एका तरुण मुला-मुलींच्या ग्रुपने तिला टार्गेट केलं आहे. सोशल मीडियावर तिला शिवीगाळ करत बलात्काराची धमकी दिली आहे. ज्यामुळे ती इतकी अस्वस्थ झाली की तिला पोलिसांची मदत घ्यावी लागली.
'पांड्या स्टोअर' या टीव्ही मालिकेत ऋषिताची भूमिका साकारणाऱ्या सिमरन बुधरूपने नुकताच असा धक्कादायक खुलासा केला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं, कि आपल्याला सोशल मीडियावर केवळ जीवे मारण्याचीच नव्हे तर बलात्काराच्या धमक्यादेखील मिळत आहेत. सुरुवातीला आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचंदेखील ती म्हणाली.
अभिनेत्रीचं म्हणणं आहे की, 'सोशल मीडियावरील एका तरुण-तरुणींच्या ग्रुपने आपल्याला टार्गेट करत शिविगाळ केली. आणि बलात्काराच्या धमक्या दिल्या आहेत.
सिमरननं सांगितलं की, तिला 13-14 वयोगटातील मुलांकडून सोशल मीडियावर धमक्या येऊ लागल्या आहेत. त्यानंतर तिने पोलिसात जाऊन गुन्हा दाखल केला आहे.
अभिनेत्रीने पुढं म्हटलं, 'पालक मुलांना अभ्यासासाठी फोन देतात, मात्र आजची मुले पालकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत आहेत'.
अभिनेत्री सिमरनची धाकटी बहीणही जवळजवळ त्याच वयाची आहे.तिला वाटतं की, पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे कारण कधीकधी त्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरक समजत नाही''.