मुंबई, 29 जानेवारी- हॉलिवूड गायक (Hollywood Singer) आणि गीतकार ख्रिस ब्राउन (Chris Brown) याच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. पीडितेने गायक ख्रिस ब्राऊनवर कॅलिफोर्नियामध्ये (California) बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेचा दावा आहे की, गायकाने आधी तिला अंमली पदार्थ पाजले आणि नंतर मुघल डीडीच्या फ्लोरिडा येथील एका यॉटमध्ये तिच्यावर बलात्कार केला. कोर्टाच्या कागदपत्रांवर पीडित महिलेची ओळख जेन डो (Jane Doe) अशी आहे.
पीडित महिला जेन डोने आरोप केला आहे की गायक ख्रिस ब्राउनने 30 डिसेंबर 2020 रोजी मियामीला पोहोचल्यानंतर महिलेला तिथे बोलावले. त्यानंतर त्याने तिला काहीतरी प्यायला दिले, ते पिल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर ब्राउनने तिला एका बेडरूममध्ये नेले. जिथे विरोध असूनही ब्राउनने तिच्यावर जबरदस्ती केली. पीडित महिला R&B स्टारकडून $20 दशलक्ष नुकसानीची मागणी करत आहे.
पीडितेचे वकील, एरियल मिशेल आणि जॉर्ज व्राबेक यांनी टीएमझेडला सांगितलं की त्यांच्या महिला क्लायंटने पोलिसांकडे या घटनेची तक्रार नोंदवली नव्हती. कारण घडलेल्या या घटनेने ती अस्वस्थ होती.
या तक्रारीत जेन डो यांनी स्वत:साठी न्याय मागितला आहे. त्यांनी आशा व्यक्त केली आहे की, हे प्रकरण त्या इतर महिलांसाठी एक उदाहरण म्हणून काम करेल, जे यापूर्वी ख्रिस ब्राउनच्या अशा कृत्यांचे बळी ठरले असतील. महिलेचा आरोप आहे की ब्राऊनने दुसऱ्या दिवशी तिच्याशी संपर्क साधला आणि संभाव्य गर्भधारणा टाळण्यासाठी प्लॅन बी घेण्याची विनंती केली.
Published by:Aiman Desai
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.