Home /News /entertainment /

Asim Riazला आधीच लागली होती चाहूल; Sidharthच्या मृत्यूपूर्वी लिहिली होती अशी पोस्ट

Asim Riazला आधीच लागली होती चाहूल; Sidharthच्या मृत्यूपूर्वी लिहिली होती अशी पोस्ट

‘बिग बॉसचे 13’मध्ये असिम रियाझ आणि सिद्धार्थ शुक्ला एकत्र होते.

मुंबई, 2 सप्टेंबर- एखादी वाईट घटना घडणार असेल किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीवर काही संकट येणार असेल तर काही वेळा आपलं मन अस्वस्थ होतं, कसलीतरी हुरहूर लागलेली असते. नेमके काय ते कळत नसते मात्र काहीतरी अशुभ घडणार आहे असं वाटतं असतं, जणू अशीच काहीशी हुरहूर अभिनेता असीम रियाझ (Asim Riaz) याला काही दिवसांपासून लागली होती. तशा आशयाची पोस्ट त्यानं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली होती आणि आज अचानक सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याच्या मृत्यूची बातमी आली. बिग बॉसच्या 13 व्या (Big Boss-13) पर्वात सुरुवातीला मित्र असणारे हे अभिनेते नंतर, मात्र कट्टर वैरी झाले होते. तरीही त्यांच्यातील एक अनोखा बंध दर्शवणाऱ्या या घटनेबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक झालेल्या निधनाने संपूर्ण टीव्ही आणि चित्रपटसृष्टी हादरून गेली आहे. अवघ्या 40व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्यानं या तरुण अभिनेत्याचे (Actor) आज निधन (Death) झालं. छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय अभिनेत्याने फारच अकाली एक्झिट घेतल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्ये (TV Serials) काम केलेल्या सिद्धार्थनं ‘बिग बॉसचे 13’वे पर्वही जिंकले होते. या रिअॅलिटी शोमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि असीम रियाझ यांच्यातील वादाने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. या शोच्या सुरुवातीला हे दोघे चांगले मित्र झाले होते; पण नंतर दोघांमध्ये चांगलाच संघर्ष निर्माण झाला होता. शोमध्येही त्यांचे वाद टोकाला गेले होते. बिग बॉस ट्रॉफीसाठीही दोघांच्यातच खरी लढत झाली. अखेर मतांच्या आधारावर सिद्धार्थनं बाजी मारली आणि तो बिग बॉस-13चा विजेता ठरला.
या शोनंतर असीम रियाझ आणि सिद्धार्थ शुक्ला कधीच आमनेसामने आले नाहीत. त्यांचे चाहते मात्र त्याच्यावरून एकमेकांशी भांडायचे. या पार्श्वभूमीवर असीम रियाझने काही दिवसांपूर्वी शेअर केलेली पोस्ट सगळ्यांनाच धक्का देणारी ठरली आहे. असीम रियाझने त्याच्या इन्स्टास्टोरीत (Insta Story) म्हटलं आहे की, ‘मला माहीत नाही की आज मला इतकं उदास (Upset), आतून तुटल्यासारखं का वाटत आहे. मी व्यायाम करतोय, पण त्यात मन नाही. हजारो विचारांचं काहूर माजलंय जणू ते मला मारायला उठले आहेत. कोणतीच भावना मनाला स्पर्श करत नाही आहे. प्रत्येकजण प्रसिद्धी आणि पैशाच्या मागे धावत आहे. तुम्हाला कळलं ना, मला काय म्हणायचं आहे ते.’
ही पोस्ट वाचून असं वाटतं की जणू असीम रियाझला कोणत्यातरी अशुभ संकटाचे संकेत मिळाले होते. त्याचं हुरहुरीतून त्यानं ही पोस्ट लिहिली असावी. एकेकाळी मित्र असलेल्या या दोघांमध्ये नंतर वैर निर्माण व्हावे आणि एकाच्या मृत्यूच्या चाहुलीनं दुसऱ्याला अस्वस्थता यावी, हे किती विलक्षण आहे. याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.
First published:

Tags: Siddharth shukla

पुढील बातम्या