मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO : मुकेश अंबानींची मोठी सुनबाई दुसऱ्यांदा होणार आई, श्लोका मेहताच्या बेबी बंपनं वेधलं लक्ष

VIDEO : मुकेश अंबानींची मोठी सुनबाई दुसऱ्यांदा होणार आई, श्लोका मेहताच्या बेबी बंपनं वेधलं लक्ष

मुकेश अंबानींची मोठी सुनबाई दुसऱ्यांदा होणार आई

मुकेश अंबानींची मोठी सुनबाई दुसऱ्यांदा होणार आई

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मोठी सुनबाई श्लोका मेहता पुन्हा एकदा प्रेग्नेंट आहे, लवकरच ती आई होणार आहे. आकाश अंबानीची पत्नी (Akash Ambani Wife) NMACC लॉन्च सोहळ्यावेळी बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 एप्रिल- Akash Ambani Shloka Mehta Pregnant Again: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानीचा नुकताच राधिका मर्चेंटसोबत साखरपुडा झाला आहे. तर मुलगी ईशा अंबानीला जुळाची मुलं झाली आहेत. आता त्यांच्या मोठा मुलगा आकाश अंबानी आणि सुनबाई श्लोका मेहता (Akash Ambani Shloka Mehta) यांच्याकडे पुन्हा एकदा गुडन्यूज आहे. कल्चरल सेंटरच्या( NMACC ) उद्घाटन सोहळ्यावेळी ही जोडी मीडियावाल्यांना पोझ देत होती तेव्हा श्लोका मेहताने एक सुंदर साडी नेसली होती.

साडीमध्ये श्लोका मेहता बेबी बंप (Shloka Mehta Baby Bump) फ्लॉन्ट करताना दिसली. या जोडीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. पृथ्वी अंबानी नंतर आता यांच्या घरात आणखी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

वाचा-नीता अंबानीचं कल्चरल सेंटर पाहूनच दिपतील डोळे; NMACCचे Inside Photo

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मोठी सुनबाई श्लोका मेहता पुन्हा एकदा प्रेग्नेंट आहे, लवकरच ती आई होणार आहे. आकाश अंबानीची पत्नी (Akash Ambani Wife) NMACC लॉन्च सोहळ्यावेळी बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, आकाश अंबानी हिरव्या रंगाच्या कुर्तीमध्ये तर श्लोकाने गोल्डन रंगाची साडी आणि गुलाबी रंगाची ओढणी परिधान केली होती. त्याबरोबर तिने छान ज्वेलरीही घातली होती. दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत होती. ही जोडी जेव्हा मीडियावाल्यांना पोझ देत होती तेव्हा श्लोका मेहता बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली.

यावरून श्लोका मेहता प्रेग्नेंट असल्याची चर्चा रंगली आहे.मात्र याबद्दल अंबानी कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तिच्याकडे पाहून अनेकांनी ती गरोदर असल्याचे म्हटले आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

कसं असणार कल्चरल सेंटर?

'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'चं 31 मार्च रोजी उद्घाटन करण्यात आलं. नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र हे भारतातील पहिलं बहुविद्याशाखीय सांस्कृतिक क्षेत्र मुंबईत सुरू झालं आहे.नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर ग्लोबल म्युझियम स्टँडर्ड अंतर्गत तयार करण्यात आलं आहे.भारत आणि जगभरातील कलात्मक प्रदर्शनांचे जतन केलं जाणार आहे. हे सांस्कृतिक केंद्र हायटेक सुविधांनी सुसज्ज आहे.नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये डायमंड बॉक्स, स्टुडिओ थिएटर, आर्ट हाऊस आणि सार्वजनिक कला अशा अनेक गोष्टी आहेत.या सेंटरमध्ये प्रेक्षकांना जागतिक दर्जाचा अनुभव घेता येणार आहे. ग्रँड थिएटरमधील प्रत्येक प्रदर्शन हा प्रेक्षकांना तल्लीन करणारा अनुभव असणार आहे.त्याचप्रमाणे एंटीग्रेटेड डॉल्बी अॅटमॉस सराउंड साउंड सिस्टम आणि व्हर्च्युअल साउंड सिस्टम देखील तयार करण्यात आली आहे.

सांस्कृतिक केंद्रामध्ये 3 हाय-टेक स्टुडिओ असतील. ज्यात 2,000 आसन क्षमतेचे ग्रँड थिएटर त्याचप्रमामे 250 आसनांचे एडवांस स्टुडिओ थिएटर आणि 125 डायनॅमिक सीट क्यूब थिएटर यांचा समावेश आहे. तसंच या सांस्कृतिक केंद्रात 4 मजली कलागृह देखील आहे.NMACC वर बोलताना नीता अंबानी म्हणाल्या, 'भारतीय कलांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आम्ही वचनबद्ध' आहोत.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Mukesh ambani, Neeta Ambani