मुंबई, 08 ऑक्टोबर: बिग बॉसचा (Bigg Boss 13) 13 वा सीझन अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla and Shehnaz Gill) आणि अभिनेत्री शेहनाझ गिल या जोडीने गाजवला होता. बिग बॉसच्या घरात ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याचंही बोललं जात होतं. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावरही चाहत्यांमध्ये त्यांच्या अफेअरची चर्चा (Siddharth Shukla and Shehnaz Gill affair rumor) कायम होती. एवढंच नव्हे तर शेहनाझच्या मोबाईलवर सिद्धार्थचा फोटो वॉलपेपरला दिसल्याने त्यांच्या नात्याबाबत चर्चा सुरूच होती. मात्र, त्यानंतर सिद्धार्थचं आकस्मिक निधन (Siddharth Shukla death) झालं. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी ऐकून शेहनाझ गिल पुरती हादरून गेली होती. बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला याचं 2 सप्टेंबर 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं (Siddharth Shukla died of heart attack) निधन झालं. 40 वर्षीय सिद्धार्थच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे. पण शेहनाझ गिलची अवस्था सर्वात वाईट होती. बिग बॉस 13 च्या दरम्यान शेहनाझ गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची भेट झाली. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. सिद्धार्थच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. शेहनाझ गिलची अवस्था सर्वात वाईट होती. शेहनाझसाठी हा मोठा धक्का होता. त्यानंतर बराच काळासाठी ती दिसलीच नाही. पण आता शेहनाझने पुन्हा काम सुरू केलं आहे. तिचा एक व्हिडीओही समोर आला आहे. 1600 कोटींची मालकीण आहे किंग खानची पत्नी, जाणून घ्या गौरीविषयी… सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर प्रत्येकाला शेहनाझ गिलबद्दल जाणून घ्यायचं होतं. शेहनाझ गिलचा पहिला चित्रपट ‘हौसला रख’ (Shehnaz Gill movie Hausla Rakh) 15 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शहनाझ गिल अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझसोबत (Diljit Dosanjh and Shehnaz Gill movie) दिसणार आहे. या चित्रपटाचं एक प्रमोशनल गाणं शूट केलं जाणार होतं ज्यात शेहनाझ देखील दिसणार आहे. 7 ऑक्टोबर रोजी शेहनाझ कामावर परतणार असल्याची बातमी वणव्यासारखी पसरली. अशातच आता या चित्रपटाच्या सेटवरून एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे.
सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर 5 आठवड्यांनी शेहनाझ गिलनं काम सुरू केलं आहे. सेटवर येताच दिलजीत दोसांझला तिनं चेष्टामस्करीत मार देखील दिला. ‘हौसला रख’ चित्रपटाच्या सेटवरील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. शेहनाझ आणि दिलजीत या व्हिडीओत चेष्टामस्करी करताना दिसत आहेत. पण अचानक शेहनाझने दिलजीतला मारायला सुरूवात केली. दिलजीतने तिच्या हातचा चांगलाच मार खाल्ला. अनेक दिवसानंतर शेहनाझ कामावर परतल्याने चाहत्यांकडून या व्हिडीओला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शेहनाझला बघून चाहते खूश आहेत.