मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Tu Yaheen Hai Song: शेहनाजनं स्वतः च्या आवाजात दिलं सिद्धार्थला Tribute;व्हिडीओ पाहून चाहत्यांना अश्रू अनावर

Tu Yaheen Hai Song: शेहनाजनं स्वतः च्या आवाजात दिलं सिद्धार्थला Tribute;व्हिडीओ पाहून चाहत्यांना अश्रू अनावर

 'बिग बॉस 13' (Bigg Boss 13) फेम शहनाज गिलने (Shehnaaz Gill) दिवंगत अभिनेता आणि बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाला(Sidharth Shukla) श्रद्धांजली वाहिली आहे.

'बिग बॉस 13' (Bigg Boss 13) फेम शहनाज गिलने (Shehnaaz Gill) दिवंगत अभिनेता आणि बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाला(Sidharth Shukla) श्रद्धांजली वाहिली आहे.

'बिग बॉस 13' (Bigg Boss 13) फेम शहनाज गिलने (Shehnaaz Gill) दिवंगत अभिनेता आणि बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाला(Sidharth Shukla) श्रद्धांजली वाहिली आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 29ऑक्टोबर- 'बिग बॉस 13' (Bigg Boss 13) फेम शहनाज गिलने (Shehnaaz Gill) दिवंगत अभिनेता आणि बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाला(Sidharth Shukla) श्रद्धांजली वाहिली आहे. एका गाण्याच्या माध्यमातून तिने ही श्रद्धांजली दिली आहे. या गाण्याचे नाव 'तू यही है' असं आहे. हे गाणं (New Song) तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. विशेष म्हणजे हे गाणं स्वतः शहनाज गिलने गायलं आहे. आणि त्याच्या ओळी राज रणजोध यांनी लिहिल्या आहेत. राज यांनी त्याचं संगीत दिलं आहे. गाण्यात शहनाजने सिद्धार्थबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. बिग बॉस 13 मधील शहनाज आणि सिद्धार्थच्या व्हिडिओ क्लिपने गाण्याची सुरुवात होते. ज्यामध्ये शहनाज सिद्धार्थला म्हणते, "तू माझा आहेस, ठीक आहे. मी इथे सगळ्यांना फाडून टाकेन. मी इथे गेम जिंकण्यासाठी आले नाही, मला तुला जिंकायचं आहे."

" isDesktop="true" id="624496" >

'तू ये ही है' हे गाणं तुम्हाला खूप भावूकही करत आहे सोबतच एक रिलेशनशिप गोलही देत आहे. या गाण्यात सिद्धार्थ शुक्लाच्या काही जुन्या व्हिडिओ क्लिपचाही समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये तो शहनाजसोबत मस्ती करताना दिसत आहे. यासोबतच दोघांमधील काही भावनिक क्षणही दाखवण्यात आले आहेत. व्हिडिओच्या शेवटी सिद्धार्थचा आवाजही ऐकू येतो. ज्यामध्ये सिद्धार्थ शहनाजला 'सना' या टोपण नावाने हाक मारत आहे.

सिद्धार्थ शुक्लाचं गेल्या महिन्यात २ तारखेला हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजला धक्का बसला होता आणि एक महिन्याहून अधिक काळानंतर ती तिचं प्रोफेशनल कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी आली होती. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर सिडनाजची जोडी तुटली. पण ती लोकांच्या हृदयात प्रेमाच्या रूपात कायम आहे. सिद्धार्थच्या जाण्यानं शहनाज एकटी पडली आहे.सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची पहिली भेट 'बिग बॉस 13' मध्येच झाली होती. शोदरम्यान दोघांची केमिस्ट्री अशी बनली की शोनंतरही ती कायम राहिली होती.

(हे वाचा:Sidharth च्या मृत्यूनंतर shehnaaz ची पहिली Insta Post; पाहून चाहते झाले ... )

शहनाज गिलने सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूबद्दल किंवा त्याच्याबद्दल एक शब्दही काढला नव्हता. पण आता या श्रद्धांजली गाण्याच्या माध्यमातून तिने आपल्या भावना आणि दु:ख दाखवलं आहे. सिद्धार्थ शुक्ला शहनाजसाठी किती खास होता हे, हे श्रद्धांजली गीत पाहून तुमची खात्री पटेल.यापूर्वी शहनाजनं म्युझिक व्हिडिओचं पोस्टर शेअर केलं होतं. पोस्टरमध्ये सिद्धार्थ आणि शहनाज मनमोकळेपणाने हसताना दिसत आहेत. या पोस्टरमध्ये 'सिद्धार्थ शुक्ला यांना माझी मनापासून श्रद्धांजली' या शीर्षकाखाली लिहिलं गेलं आहे. या पोस्टसह, तिनं लिहिलं आहे, "तू माझा आहेस आणि..... सिद्धार्थ शुक्ला" त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये हृदय आणि स्टार इमोजी आहेत.

First published:

Tags: Entertainment, Sidharth shukla