मुंबई,14 ऑक्टोबर- 'बिग बॉस'(Bigg Boss) फेम पंजाबी अभिनेत्री आणि गायिका शेहनाज गिल (Shehnaaz Gill) सध्या फारच कठीण काळातून जात आहे. तिने कधी विचारही केला नव्हता ती ज्याच्यावर जीव ओवाळून टाकत होती तोच एकेदिवशी या जगातून निघून जाईल. अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने(Sidharth Shukla) शेहनाजला जबरदस्त धक्का बसला होता. त्यांनतर ती सोशल मीडियापासून दूर होती. मात्र आता तिला सावरणं भाग आहे. आपल्या व्यावसायिक बाबींमुळे तिला पुन्हा एकदा ऍक्टिव्ह व्हावं लागलं आहे. येत्या १५ ऑक्टोबरला तिचा पंजाबी चित्रपट 'होंसला रख'रिलीज होत आहे. या निमित्ताने तिने पहिल्यांदा मीडियाशी संवाद साधत प्रेम आणि एखाद्या व्यक्तीची सवय यावर भाष्य केलं आहे.
View this post on Instagram
शेहनाज गिल 'होंसला रख' या पंजाबी चित्रपटातून आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटात शेहनाजसोबत गायक आणि अभिनेता दलजित दोसांजी आणि अभिनेत्री सोनम बाजवा आहे.सध्या हे कलाकार या चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यग्र आहेत. शेहनाजने नुकताच स्वतःला सावरत आपली प्रोफेशनल कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी 'होंसला रख'च्या प्रोमोशनमध्ये सहभाग घेतला आहे. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाजने स्वतःला कॅमेरा आणि लाइमलाईटपासून दूर राहात आपल्या घरातच कैद केलं होतं. त्यांनतर एक महिन्यापेक्षा जास्त दिवस उलटल्यानंतर ती आपल्या चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये दिसून आली. मात्र तिचा चेहरा उदास असल्याचं सर्वानाच दिसून आलं.
(हे वाचा:Shehnaz Gill या दिवशी शूटिंगवर परतणार; जाणून घ्या डिटेल्स – News18 ... )
मला आईसारखं प्रेम जाणवतं-
सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाजने प्रथमच मीडियाला मुलाखत दिली आहे. बॉलिवूड बबलशी संवाद साधत शेहनाज गिलने प्रेम आणि अटॅचमेंटबद्दल सांगितलं. यावेळी बोलताना ती म्हणाली. 'जेव्हा तुम्ही एखाद्यावर जीवापाड प्रेम करता तेव्हा तुम्हाला त्याची सवय होऊन जाते. त्यानुसार मी माझं गुणोत्तर काढलं. शेहनाजच्या मते आईचं प्रेम जे असतं ते किती प्रचंड असतं. ते फक्त आईलाच माहिती असतं त्याचा अंदाजा आपण नाही लावू शकत. मलासुद्धा असंच प्रेम जाणवतं. असं म्हणत शेहनाजने आपलं मन मोकळं केलं आहे.
(हे वाचा:Honsla Rakh: शेहनाज गिलच्या चित्रपटाचं नवं पोस्टर झालं रिलीज ... )
चित्रपटातील भूमिका-
शेहनाजने 'होंसला रख'या चित्रपटात एका मुलाच्या आईची भूमिका साकारली आहे. तिने या भूमिकेबद्दल बोलताना सांगितलं, 'या चित्रपटात मी ४० टक्के रियल लाईफ मध्ये आहे तशीच यात दाखवल आहे. सिद्धार्थच्या जाण्यानंतर शेहनाजने पहिल्यांदाच काही तरीबोललं आहे. त्यामुळे सध्या ती प्रचंड चर्चेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Sidharth shukla