मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sidharth Shuklaच्या मृत्यूच्या 3 महिन्यानंतर यांच्यासोबत वेळ घालवतेय शेहनाज गिल; VIDEO झाला VIRAL

Sidharth Shuklaच्या मृत्यूच्या 3 महिन्यानंतर यांच्यासोबत वेळ घालवतेय शेहनाज गिल; VIDEO झाला VIRAL

 बिग बॉस १३   (Bigg Boss 13)  ची लोकप्रिय स्पर्धक आणि पंजाबी अभिनेत्री, गायिका शेहनाज गिल  (Shehnaaz Gill)   पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शेहनाज गिलला अभिनेता आणि बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाच्या   (Sidharth Shukla)   अचानक मृत्यूने मोठा धक्का बसला होता.

बिग बॉस १३ (Bigg Boss 13) ची लोकप्रिय स्पर्धक आणि पंजाबी अभिनेत्री, गायिका शेहनाज गिल (Shehnaaz Gill) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शेहनाज गिलला अभिनेता आणि बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) अचानक मृत्यूने मोठा धक्का बसला होता.

बिग बॉस १३ (Bigg Boss 13) ची लोकप्रिय स्पर्धक आणि पंजाबी अभिनेत्री, गायिका शेहनाज गिल (Shehnaaz Gill) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शेहनाज गिलला अभिनेता आणि बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) अचानक मृत्यूने मोठा धक्का बसला होता.

पुढे वाचा ...

मुंबई, 1 डिसेंबर-   बिग बॉस १३   (Bigg Boss 13)  ची लोकप्रिय स्पर्धक आणि पंजाबी अभिनेत्री, गायिका शेहनाज गिल  (Shehnaaz Gill)   पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शेहनाज गिलला अभिनेता आणि बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाच्या   (Sidharth Shukla)   अचानक मृत्यूने मोठा धक्का बसला होता. या परिस्थितून अभिनेत्रीला सावरणं मोठं कठीण झालं होतं. मात्र वेळेनुसार ती स्वतः ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. नुकताच शेहनाज गिलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल   (Viral Video)  झाला आहे. यामध्ये ती काही खास लोकांसोबत आपला वेळ घालवताना दिसून आली आहे.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला या जगाचा निरोप घेऊन तीन महिने होत झाले आहेत. या दरम्यान शेहनाज गिल स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. या दोघांचे चाहते, मित्र आणि कुटुंबीय तिला या धक्क्यातून सावरण्यास मदत करत आहेत. नुकताच शेहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाच्या इन्स्टाग्रामच्या एका फॅन पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये शेहनाज गिल काही लहान मुलींसोबत वेळ घालवताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ अमृतसर पंजाबमधील आहे. शेहनाज गिलणे नुकताच पिंगलवाडा येथील एका अनाथाश्रमला भेट दिली होती. तेव्हाच हा व्हिडीओ आहे. यामध्ये ती लहान मुलींसोबत फारच आनंदी दिसून येत आहे. तसेच तेथील सर्व कर्मचाऱ्यांसोबतचा एक फोटोही या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शेहनाज गिलची अवस्था फारच वाईट झाली होती. तिने सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवलं होतं. तब्बल २ महिन्यांनंतर तिने सोशल मीडियावर पुनरागमन केलं आहे. तसेच तिने या माध्यमातून सिद्धार्थ शुक्लाला आदरांजलीही दिली होती. यासाठी तिने सिद्धार्थ शुक्लच्या आठ्वणींसोबत एक खास सॉन्ग तयार केलं होतं. हे गाणं पाहून सर्वांचेच डोळे पाणावले होते.यामध्ये शेहनाज आणि सिद्धार्थच्या बिग बॉसच्या आठवणींचा समावेश करण्यात आला होता. तसेच या दरम्यान सिद्धार्थ आणि शेहनाजचा एकत्र शेवटचा व्हिडीओ ऍल्बम हॅबिट देखील रिलीज झाला आहे. तसेच शेहनाजने तब्बल २ महिन्यानंतर आपल्या 'होंसला रख' या पंजाबी चित्रपटातून वापसी केली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती पहिल्यांदा मीडियासमोर आली होती.

(हे वाचा:Sidharth च्या मृत्यूनंतर shehnaaz ची पहिली Insta Post; पाहून चाहते झाले ... )

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाजने प्रथमच मीडियाला मुलाखत दिली होती. यावेळी बोलताना ती म्हणाली. 'जेव्हा तुम्ही एखाद्यावर जीवापाड प्रेम करता तेव्हा तुम्हाला त्याची सवय होऊन जाते. त्यानुसार मी माझं गुणोत्तर काढलं. शेहनाजच्या मते आईचं प्रेम जे असतं ते किती प्रचंड असतं. ते फक्त आईलाच माहिती असतं त्याचा अंदाजा आपण नाही लावू शकत. मलासुद्धा असंच प्रेम जाणवतं. असं म्हणत शेहनाजने आपलं मन मोकळं केलं होतं. शेहनाज आणि सिद्धार्थ बिग बॉसच्या घरात पहिल्यांदा भेटले होते. शोमध्ये या दोघांचं खूप छान बॉन्डिंग झालं होतं. घरामध्ये अनेकवेळा या दोघांनी एकमेकांसाठी फीलिंग्स व्यक्त केल्या होत्या. या दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत होती.

First published:

Tags: Entertainment, Sidharth shukla