मुंबई, 07 जानेवारी : टेलिव्हिजनवरील शार्क टँक इंडिया शो नेहमीच विविध कारणांमुळे जोरदार चर्चेत असतो. या शोमधील जजेसचं नशीब सध्या पूर्णपणे पालटलं आहे. त्यात या शोमधील एका शार्क अर्थात जज्जने प्रसिद्ध बॉलिवूड सेलेब्रिटी करण जोहरसोबत एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. खरंतर करण जोहर शार्क टँक मधील जजेसवर जाम चिडला आहे. अर्थात यामागे खास कारणदेखील आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयीची माहिती दिली आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड सेलेब्रिटी करण जोहरला ब्रँडेड वस्तूंविषयी विशेष प्रेम आहे. तो वापरत असलेले चित्रविचित्र डिझाईनचे ड्रेस, स्टायलिश गॉगल्स आणि महागड्या अंगठ्यावरून करणला ब्रँडेड वस्तू विशेष प्रिय असल्याचं दिसतं. सध्या करण जोहर सनग्लासेसमुळे जोरदार चर्चेत आहे. करणला एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील चष्मा खूप आवडला. पण हा चष्मा खूप स्वस्त असल्याची करणची तक्रार होती. त्यामुळे करणने शार्क टँक इंडियातील शार्क पीयूष बन्सल यांना तो चष्मा खरेदी करण्यासाठी हजारो रुपयांची ऑफर दिली.
हेही वाचा - Rohit Shetty: स्टंट करणं रोहित शेट्टीला पडलं महागात; शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत
वास्तविक, हा करण जोहरच्या ताज्या जाहिरातीचा व्हिडिओ आहे. नुकताच शार्क टँक इंडिया सीझन 2 चे शार्क पीयूष बन्सल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना पीयूष कॅप्शनमध्ये लिहितात, ``या व्हिडिओचे कॅप्शन कोणालाही समजणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल.`` त्यानंतर व्हिडिओच्या खाली करण जोहरला टॅग करून पीयूष लिहितात, करण जोहर मी सध्या शहराबाहेर आहे. करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं आहे, ``पीयूष बन्सल मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. कृपया माझा कॉल रिसीव्ह करा.``
View this post on Instagram
दरम्यान, या व्हिडिओत करण जोहर हिरव्या रंगाचा सूट परिधान करून परदेशातील एका कॅफेत बसलेला दिसत आहे. यावेळी करण पीयूष यांना कॉल करतो. पण भारतात असलेले पीयूष झोपलेले आहेत. त्यात ते करणचा कॉल रिसीव्ह करतात. तेव्हा करण त्यांना सांगतो,``मला तुमच्या कंपनीच्या वेबसाइटवरील ग्लासेसची एक जोडी खूप आवडली आहे.`` करण पीयूष यांना विचारतो की ``या ग्लासेसची किंमत 999 डॉलर आहे का? तथापि, पीयूष यांनी करणचा गैरसमज दूर करताना सांगितले की ``नाही, त्यांची किंमत 999 रुपये आहे.`` पीयूष यांच्या तोंडून ग्लासेसची किंमत ऐकून करणला आश्चर्याचा धक्का बसतो आणि तो म्हणतो की ``मी एक लाख रुपयांपेक्षा कमी किमतीचे ग्लासेस वापरत नाही.`` त्यामुळे करण जोहर पीयूष यांना त्या चष्म्यासाठी 90 हजार किंवा 80 हजार रुपयांची ऑफर देतो. त्यावर पीयूष करणला एखाद्या महागड्या ब्रँडचा चष्मा खरेदी करण्याचा सल्ला देतात आणि फोन कट करतात. यावर, ``तुला श्रीमंत लोकांचा शाप लागेल, पण आमची अशी इच्छा नाही,`` असं करण जोहर पीयूष बन्सल यांना म्हणतो. सध्या हा व्हिडिओ जोरदार चर्चेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Karan Johar