मुंबई, 11 फेब्रुवारी- छोट्या पडद्यावर सध्या जोरदार चर्चेत असलेला शो म्हणजे शार्क टॅंक होय. या शोच्या माध्यमातून तरुण उद्योजकांना व्यवसायात पाय रोवण्यासाठी गुंतवणूक केली जाते. यामध्ये अनेक प्रसिद्ध उद्योजक परीक्षकाच्या खुर्चीवर बसलेले दिसून येतात जे या गुंतवणुकीसाठी पुढाकार घेतात. सध्या या शोचा दुसरा सीजन सुरु आहे. हा शो गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. दरम्यान आता या शोमधील परीक्षक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेले पाहायला मिळत आहेत. एका स्पर्धकाने त्यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ माजवली आहे. ‘शार्क टॅंक’ या शोची थीम सर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या शोच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना आपल्या उद्योजकीय कल्पना फुलविण्यास मदत मिळत आहे. या शोचा पहिला सीजन प्रचंड लोकप्रिय ठरला होता. त्यामुळे आता दुसरा सीजन सुरु करण्यात आला आहे. दरम्यान पहिल्या सीजनच्या एका स्पर्धकाने या शोमधील परीक्षकांवर फसवणुकीचा गंभीर आरोप करत सर्वांनाच चकित केलं आहे. (हे वाचा: Shiv Thakare: बिग बॉस संपण्यापूर्वीच शिव ठाकरेचं नशीब चमकलं; ऑफर झाला मोठा शो ) पहिल्या सीजनमधील स्पर्धक आणि IWebTechno चे संस्थापक असलेले अक्षय शाह यांनी आपल्या ट्विटमधून याबाबत खुलासा करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते याशोमधील दोन परीक्षकांनी त्यांना गुंतवणूक करण्याचा आश्वासन देऊन नंतर पलटी मारली आहे. त्यांनी आश्वासन देऊनसुद्धा तसं न केल्याचं अक्षय यांचं म्हणणं आहे. त्यांनी शोनंतर आपला विचार बदलला असून त्यांचं वागणं बदललल्याचसुद्धा अक्षय यांनी सांगितलं आहे.
Met a founder yesterday who had got a deal from 2 sharks in season 1 and who never met him nor responded to his mails post #SharkTankIndia - Ab kya bolen? #Chutiyapa
— Akshay Shah - Founder CEO, iWebTechno | GenZDealZ (@AkshayiWeb) February 5, 2023
शार्क टॅन्कच्या परीक्षकांवर आरोप करत अक्षय यांनी सांगितलं की, ‘शार्क टॅंक हा शो संपल्यानंतर यातील परीक्षक मला कधीही भेटले नाहीत. त्यांनी मला कोणतेच गुंतवणुकीचे पैसे दिलेले नाहीत. इतकंच नव्हे तर त्यांनी माझ्या कोणत्याच मेलला उत्तरसुद्धा दिलेलं नाहीय.
Not getting funding and not getting response post agreeing to fund, dono alag hai boss.
— Akshay Shah - Founder CEO, iWebTechno | GenZDealZ (@AkshayiWeb) February 6, 2023
दरम्यान अनेक नेटकऱ्यांनी अक्षय यांना तुम्ही थेट नावासह का त्यांना विचारत नाही असे विचारलं असता, त्यांनी आपल्याला भीती वाटत असल्याचं म्हटलं आहे. आपल्यासोबत पहिल्या सीजनमधील जवळजवळ 50 टक्के स्पर्धकांना हाच अनुभव आल्याचं सांगितलं आहे.
अक्षय शाह यांच्या या ट्विटनंतर चांगलीच खळबळ माजली आहे. याअक्षय शाह यांच्या ट्विटनंतर या शोबाबत लोक विविध मत मांडत आहेत. आता याशोच्या फॉरमॅटवर नेटकरी विविध प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान शार्क टॅंकच्या दुसऱ्या सीजनमध्ये नमिता थापर, अनुपम मित्तल, विनिता सिंग, अमन गुप्ता, अमित जैन आणि पियुष बन्सल हे परीक्षक म्हणून दिसून येत आहेत.11