मुंबई, 03 मार्च : आपल्या सुरेल स्वरांनी रसिकांच्या मनावर भुरळ घालणाऱ्या शंकर महादेवन यांचा आज 53 वा वाढदिवस आहे. त्यांच्या गाण्यानं हिंदी, मराठी, तेलगु, मल्याळम, कन्नड रसिकांच्या मनाला वेड लावलं आहे. 'ब्रिथलेस' या गाण्यानं त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. हे गाणं गाताना त्यांनी तब्बल तीन मिनिटं श्वास रोखून धरला होता. याशिवाय आतापर्यंत त्यांचा 4 वेळा उत्कृष्ट गायक म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे. ब्रिथलेस हे गाणं जेव्हा आलं तेव्हा रसिकांनी ते अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. या गाण्यानं रसिकांच्या मनाला भुरळ घातली होती. जवळपास 6 मिनिटांच्या या गाण्यात त्यांनी 3 मिनिटं श्वास रोखून धरला होता. संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांची ओळख आहे. अनेक सिनेमांसाठी त्यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.
सूर निरागस हो, घेई छंद मकरंद, मनमंदिरा ही एकापेक्षा सरस गाणी त्यांनी गायली आहेत. शंकर महादेवन यांचा जन्म ३ मार्च 1968 रोजी झाला. केरळमधल्या तमिळ अय्यर कुटुंबात मुंबईत जन्म झाला. मातृभाषा तमिळ असली तरी त्यांची कर्मभूमी मात्र महाराष्ट्रच आहे.
ख्यातनाम संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे संगीताचे आणि गायनाचे धडे घेतले. त्यांनी गायनासोबतच मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनियरिंगची बी. ई. पदवी घेतली. त्यानंतर 6 वर्ष त्यांनी कंपनीत नोकरीही केली. त्यांनी बॉलिवूडमधील आयटम सॉन्गपासून ते तारे जमीन पर सारख्या चित्रपटातील हटके आणि इमोशन संगीतापर्यंत वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायली आहेत. मेरी माँ हे गाणं ऐकून आजही आपल्या डोळ्याच्या पाणावल्याशिवाय राहात नाहीत.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.