मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अशी कळली शनायाला प्रेमाची किंमत

अशी कळली शनायाला प्रेमाची किंमत

रसिका सुनीलचा 'गॅटमॅट' सिनेमा येत्या 16 नोव्हेंबरला रिलीज होतोय. त्यानिमित्तानं तिच्याशी केलेली ही बातचीत

रसिका सुनीलचा 'गॅटमॅट' सिनेमा येत्या 16 नोव्हेंबरला रिलीज होतोय. त्यानिमित्तानं तिच्याशी केलेली ही बातचीत

रसिका सुनीलचा 'गॅटमॅट' सिनेमा येत्या 16 नोव्हेंबरला रिलीज होतोय. त्यानिमित्तानं तिच्याशी केलेली ही बातचीत

    मुंबई, 12 नोव्हेंबर : यावेळीही शनायाची अदा तीच आहे. काॅलेज कुमारीसारखं ती जगतेय. कारण ती परत येतेय ती काॅलेजमधूनच. रसिका सुनीलचा 'गॅटमॅट' सिनेमा येत्या 16 नोव्हेंबरला रिलीज होतोय.

    गॅटमॅट सिनेमाबद्दल बोलताना शनाया म्हणाली, 'मी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. माझं नाव काव्या आहे.  तिची भेट रंग्या नावाच्या मुलाशी होते. तो गावातून आला असतो. ती खूप प्रेमळ मुलगी असते.'

    या सिनेमा अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे हे कलाकार आहेत. काॅलेज तरुण-तरुणींचं प्रेम जुळवून देण्यासाठी दोन मित्र रंग्या आणि बगळ्या स्वत:ची एजन्सी सुरू करतात. मग सुरू होतात एकेक गमतीजमती. अगदी त्यांची रवानगी तुरुंगात होण्यापर्यंतही घटना घडतात.

    शनाया खूप लोकप्रिय होती. हीच लोकप्रियता सिनेमात कॅश केली गेलीय का? यावर हसून रसिका म्हणते,  'सिनेमातली काव्या शनायापेक्षा खूप वेगळी आहे. ही शनायासारखी कनिंग नाही. दोन्ही व्यक्तिरेखा पूर्ण वेगळ्या आहेत.'

    मध्यंतरी रसिकाचा 'यु अँड मी' हा म्युझिक अल्बमही रिलीज झाला होता. त्याबद्दल ती म्हणाली, ' आदिती आणि मी चांगल्या मैत्रिणी आहोत. असंच ग्रुपमध्ये चर्चा झाली. एकत्र गाणं करूया ठरलं आणि ते झालं. फुलवा खामकरनं कोरिओग्राफी केली होती.मजा आली करताना.'

    या गाण्याची खासियत म्हणजे स्वत: आदिती द्रविड हिने हे गाणं लिहिलं असून आदिती आणि रसिकानेच हे गाणं गायलं आहे. या अल्बमच्या निमित्ताने रसिकाच्या गायकीची नवी ओळख प्रेक्षकांना झाली. साई–पियुष यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. फुलवा खामकर हिने या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. छायांकन अमोल गोळे यांचं आहे. लोणावळा इथे चित्रित झालेल्या या एका गाण्यासाठी रसिका आणि आदिती यांनी १२ वेगवेगळे ड्रेस परिधान केले आहेत.

    रसिका आजही कुठे बाहेर पडली तरी तिला शनाया म्हणूनच हाक मारली जाते. एवढी लोकप्रिय भूमिका अचानक सोडून जाणं तिला कसं जमलं ? यावर रसिका सांगते, ' हा निर्णय घेणं खूप कठीणही गेलं. पण काही दिवसांनी आपण आपल्याला तपासून पाहायचं असतं. काही नवं करायचं असतं. मी अभिनयाचं असं ट्रेनिंग घेतलं नव्हतं. मला उत्तम कोर्स मिळाला.त्यामुळे अमेरिकेतला कोर्स करायचं ठरवलं.'

    शनाया अमेरिकेच्या एलएमध्ये शिकतेय. ती म्हणते, 'नवं शिकायला मिळतंय. मी ज्या क्लासमध्ये जाते तिथे जगभरातून मुलंमुली आलेत. त्यांना बघूनही खूप काही शिकता येतं. त्यांच्या अभिनयातही वेगळे संस्कार असतात. त्यामुळे आपलं अनुभव विश्वही विस्तारतं.'

    'शनाया सोडणं कठीण गेलं मला. पण ईशाही ती व्यक्तिरेखा चांगली करतेय.' रसिका सांगते. अमेरिकेतही काही मराठी माणसं तिला भेटली, त्यांनी तिला ओळखलं. तिच्यासोबत फोटोही काढले.

    रसिका म्हणते, 'तिथे गेल्यावर मला इथल्या माणसांच्या प्रेमाची किंमत कळली.' आता रसिका भारतात आलीय ती सिनेमाच्या प्रमोशनसाठी. 18 नोव्हेंबरला ती परतणार. नंतर ती सिनेमेच करणार आहे. पण आता ती घराबाहेर पडते तेव्हा लोक तिला शनाया म्हणून हाक मारतात. रसिकासाठी हीच मोठी कमाई आहे.

    दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक!

    First published:

    Tags: Gatmat, Rasika sunil, Shanaya