मुंबई, 11 जानेवारी- शाहरुख खानची लेक (Shahrukh Khan Daughter) सुहाना (Suhana Khan) सतत चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये (Bollywood) येण्यापूर्वीच तिने आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहते भरभरून दाद देतात. आज काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. आज सुहाना खानला आपल्या पोस्टने कोणीतरी इम्प्रेस केलं आहे. पाहूया कोण आहे तो व्यक्ती?
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानाला बॉलिवूडचा किंग म्हटलं जातं. त्याचे प्रत्येक चित्रपट सुपरडुपर हिट होतात. त्याचे अफाट चाहते आहेत. फक्त भारतातच नव्हे तर देशाबाहेरही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. तर दुसरीकडे शाहरुख खानची मुलेसुद्धा तितकीच चर्चेत असतात. शाहरुखची मुलगी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. ती सतत आपले बोल्ड अँड ब्युटीफुल फोटो शेअर करून सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आज काहीसं उलट झालं आहे. आज सुहाना खानला एका अभिनेत्याच्या शर्टलेस फोटोने इम्प्रेस केलं आहे.
View this post on Instagram
अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) नेहमीच आपल्या फिटनेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतो. त्याचा फिटनेस पाहून सर्वच थक्क होतात. तो रात्रंदिवस जीममध्ये घाम गाळत असतो. अभिनेता आपलं फिटनेस राखण्यासाठी फारच मेहनत घेतो. इतकंच नव्हे तर त्याने अनेकवर्षांपासून गोड पदार्थाला हातही नाही लावला. त्याचं हे डेडिकेशन त्याच्या प्रत्येक पोस्टमध्ये दिसून येतं. आजही अभिनेत्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो पोपटी रंगाच्या शॉर्ट्समध्ये दिसून येत आहे. तसेच टायगर या फोटोंमध्ये शर्टलेस पोज देत आहे. त्याने आपल्या डोळ्यावर सनग्लास लावले आहेत. डोक्यावंत एक हॅटसुद्धा घातली आहे. सोबतच तो आरश्यात पाहून सेल्फी घेताना दिसून येत आहे.
या फोटोला कॅप्शन देत त्यानं लिहिलं., 'उधार घेतलेली टोपी फारच गोड दिसत आहे. परंतु नंतर कदाचित डिलीट होऊ शकतं'. यावर सेलिब्रेटी मित्र भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत. या सर्वांमध्ये शाहरुख खानची लेक सुहानासुद्धा स्वतःला थांबू शकली नाही. त्याने त्यागरच्या या फोटोला लाईक केलं आहे. तर दुसरीकडे कोरियोग्राफर अहमद खानने कमेंट्स करत टायगरला म्हटलं, 'हे खरंच खूप गोड आहे. डिलीट नको करू'. तर टायगरच्या बहिणीनेसुद्धा खूपच गोड अशी कमेंट केली आहे. आई आयेशा श्रॉफनेसुद्धा स्माईली आणि हार्ट्सचे इमोजी शेअर केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Shahrukh khan, Suhana khan