जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Shahrukh khan Wife: शाहरुख खानच्या पत्नी विरोधात पोलिसांत अजामीनपात्र FIR दाखल; नेमकं काय घडलं?

Shahrukh khan Wife: शाहरुख खानच्या पत्नी विरोधात पोलिसांत अजामीनपात्र FIR दाखल; नेमकं काय घडलं?

 शाहरुख-गौरी

शाहरुख-गौरी

Shahrukh Khan Wife Gauri Khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी आणि इंटेरिअर डिझायनर गौरी खानविरोधात लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 2 मार्च- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी आणि इंटेरिअर डिझायनर गौरी खान विरोधात लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात गौरी खानविरुद्ध अजामीनपात्र कलम 409 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मुंबईचे रहिवासी किरीट जसवंत शाह यांनी तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेडचे ​​सीएमडी अनिल कुमार तुलसियानी, संचालक महेश तुलसियानी आणि ब्रँड अँबॅसिडर गौरी खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. ब्रँड अँबॅसिडर गौरी खानच्या प्रचार-प्रसिद्धीमुळे प्रभावित होऊन सुशांत गोल्फ सिटी परिसरातील तुलसियानी गोल्फ व्ह्यूमध्ये फ्लॅट विकत घेतल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. मात्र सुमारे 86 लाख रुपये घेऊनही फ्लॅट दुसऱ्याला देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गौरी खानच्या म्हणण्यावरून ऑगस्ट 2015 मध्ये सुशांत गोल्फ सिटी येथील कार्यालयात पोहोचल्याचा आरोप किरीट जसवंत शाहने केला आहे. (हे वाचा: Shahrukh Khan: शाहरुख खानकडे का आहेत महिला बॉडीगार्ड्स? इतक्या वर्षानंतर उघड झालं सीक्रेट ) या कार्ययालयात जाऊन तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेडचे ​​सीएमडी अनिल कुमार तुलसियानी आणि संचालक महेश तुलसियानी यांची भेट घेतली आणि फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी फ्लॅटची किंमत 86 लाख सांगितली. तसेच, 2016 पर्यंत फ्लॅट मिळेल, असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या खात्यात 85.46 लाख रुपये जमा केले होते. ठरलेली सर्व रक्कम देऊनही अद्याप फ्लॅटचा ताबा मिळाला नसल्याचा आरोप किरीट जसवंत शाह यांनी केला आहे. तपासादरम्यान त्याने बुक केलेला फ्लॅट दुसऱ्या कोणाला तरी हस्तांतरित केल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यानंतर तक्रारदाराने गौरी खानसह तिघांच्या विरोधात तक्रार दिली आहे. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

शाहरुख खानची पत्नी इतकीच गौरीची ओळख नसून ती स्वतः एक बिझनेस वुमेन आहे. ती इंटेरिअर डिझायनर आहे. गौरीने अनेक मोठमोठ्या उद्योजकांची आणि सेलेब्रेटींचे घर डिझाइन्स केले आहेत.या प्रकरणाबाबत गौरी खानने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात