मुंबई, 19 जानेवारी- शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर 'पठाण' चित्रपट बॉक्स ऑफिसवर 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांना खूप आवडली आहेत. आता ते चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. ट्रेलरमध्ये दीपिका, शाहरुख आणि जॉनचे दमदार खतरनाक स्टंट पाहायला मिळत आहेत. ट्रेलरला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. आता ते 'पठाण' थिएटरमध्ये जाऊन पाहण्यास उत्सुक आहेत. हा शाहरुखच्या सर्वांत महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाचं बजेट तब्बल 250 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय. या चित्रपटाद्वारे शाहरुख 4 वर्षांनंतर लीड रोल करत मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
शाहरुख खानने गेल्या 4 वर्षात 'लाल सिंग चढ्ढा', 'रॉकेट्री' आणि 'ब्रह्मास्र: पार्ट वन शिवा'मध्ये कॅमिओ केले आहेत. आता त्याचा 'पठाण' चित्रपट येतोय आणि त्यात तो मुख्य अभिनेता आहे. शाहरुखने पठाणसाठी त्याच्या बॉडी फिजिकवर खूप मेहनत घेतली आहे. 'पठाण'चा लूक बनवण्यासाठी त्याला 3 महिने लागले. त्याने त्याच्या फिटनेसवर काम केलं आणि केसही वाढवले. एवढी मेहनत करत शाहरुखने निर्मात्यांकडून तब्बल 100 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांची ही आहे फी
CNBC TV18 च्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानने 'पठाण'साठी 100 कोटी रुपये घेतले आहेत. ही फी चित्रपटातील इतर कलाकारांपेक्षा खूप जास्त आहे. दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांना त्याच्या तुलनेत 30 टक्केही मिळालेले नाहीत. दीपिकाने पठाणसाठी 15 कोटी रुपये घेतले आहेत. तर जॉन अब्राहमने 20 कोटी रुपये घेत चित्रपट साइन केला होता.
सलमान खानलाही ऑफर करण्यात आली होती मोठी रक्कम
या चित्रपटाचा प्रोड्युसर आदित्य चोप्राने सलमान खानला कॅमिओसाठी विचारलं होतं. सलमानला कॅमिओ करण्यासाठी मोठ्या रकमेची ऑफर दिल्याचा खुलासाही त्याने केला होता. मात्र सलमानने पैसे घेण्यास नकार दिला. सलमानने हे पहिल्यांदाच केलेलं नाही. गेल्या वर्षी त्याला चिरंजीवी स्टारर 'गॉडफादर'मध्ये कॅमिओसाठी मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली होती, पण त्याने ती नाकारली होती.
दरम्यान, पठाण चित्रपट रिलीज व्हायला आता फक्त एक आठवडा बाकी आहे. पुढच्या बुधवारी म्हणजेच 25 जानेवारीला चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहता येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Deepika padukone, Entertainment, John abraham, Shahrukh khan